Breaking News

जान्हवी कपूरने पकडला मुख्यमंत्र्याच्या नातवाचा हात : लग्नाची चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच काही व्यक्तींशी नाव जोडलं गेलं. त्यातीलच एक म्हणजे शिखर पहारिया. जान्हवी व शिखर यांचे बरेच फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर एकत्रित व्हायरल होताना दिसतात. दोघंही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी आता जोर धरला आहे. शिखरच्या वाढदिवसानिमित्त दोघांचा एकत्रित व्हिडीओ समोर आला आहे.

जान्हवी काय म्हणाली?

“वाढदिवसाच्या शुभेच्छा शिखू”. शिखरच्या टोपण नावाने जान्हवीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शिवाय हे दोघं तिरुपती बालाजी मंदिरामध्येही गेले होते. यादरम्यानचा व्हिडीओ एएनआयने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये जान्हवी, शिखरसह खुशी कपूरही दिसत आहे. जान्हवीने यावेळी साडी परिधान केली होती. शिखरच्या वाढदिवसानिमित्त या दोघांनी तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं.

करण जोहरने त्याच्या ‘कॉफी विथ करण ७’ या शोमध्ये दोघांमधील नात्याची पुष्टी केली होती. याआधीही जान्हवी कपूर आणि शिखर मुंबईत बऱ्याचदा एकत्र दिसले आहेत. जान्हवी कपूर आणि शिखर २०१६ मध्ये एकमेकांना डेट करत होते. मध्यंतरी दोघांमध्ये दुरावा आला होता. आता पुन्हा एकदा जान्हवी व शिखर एकत्र आल्याचे दिसत आहेत.

कोण आहे शिखर ?

शिखर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहारिया यांचा तो मुलगा आहे. शिखरच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने त्याच्याबरोबरचा एक फोटो इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती त्याचा हात पकडून चालताना दिसत आहे. तर जान्हवीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

About विश्व भारत

Check Also

“त्याने माझ्या स्तनांना स्पर्श केला अन्…” : अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग

‘हीरामंडी’ या वेब सीरिजची चर्चा अजूनही कायम आहे. १ मेला प्रदर्शित झालेल्या या सीरिजला आता …

इंदौर से निकलकर, देश और दुनियाभर में नाम कमाने वाले 8 सेलिब्रेटी

खाने के शौक़ीनों और देश का सबसे साफ़-सुथरा शहर… इंदौर. इतिहा,स की कई दिलचस्प कहानियों …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *