Breaking News

नागपुरात डेंग्यूचा पहिला बळी! : महापालिका व आरोग्य प्रशासन झोपेत

Advertisements

नागपूर शहरात आणि जिल्ह्यात डेंग्यूचा प्रकोप वाढत आहे. नागपुरात रुग्णांची वाढती संख्या पाहता डेंग्यू हा चिंतेचा विषय बनला आहे. तसेच जिल्ह्यात आय फ्लू आणि डेंग्यू या आजाराने थैमान घातले आहे. हे आजार प्रत्येक क्षेत्रात सर्वत्र पाय पसरत आहेत.अशा परिस्थितीत डेंग्यूने त्रस्त असलेल्या उमरेडच्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला. त्यामुळे नागपूर शहर आणि ग्रामीण भागात रोगराई वाढत आहे. नागपुरातील उद्यानांमध्ये साफ सफाई नाही.

Advertisements

उमरेडच्या जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक शिक्षक दिलीप ताराचंद मोटघरे (५५) रा. रेवतकर लेआऊट यांना डेंग्यू झाला होता. त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयातही उपचार सुरू होते. अशा स्थितीत गुरुवारी पहाटे पाच वाजता त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. दिलीप मोटघरे यांच्या मुलीलाही डेंग्यूची लागण झाली आहे. तसेच तिच्यावर नागपुरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप मोटघरे हे उमरेड शहरातील जीवन विकास महाविद्यालयात पर्यवेक्षक शिक्षक म्हणून कार्यरत होते. रेवतकर ले-आऊटमध्ये ते कुटुंबासह राहत होते. त्यांची एकुलती एक मुलगी इशिका मोटघरे ही नागपूरच्या लता मंगेशकर मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या तृतीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.

Advertisements

इशिकाची तब्येत अचानक बिघडल्याने तिला नागपुरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर वडील दिलीप यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांनाही उपचारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी चाचणी केली असता वडील आणि मुलगी या दोघांनाही डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. वडील दिलीप यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने गुरुवारी पहाटे ५ वाजता त्यांचे निधन झाले असून त्यांची मुलगी इशिकाच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर उमरेड नगर परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे. नागपूर महानगरपालिका गाढ झोपेत असून नागरिकांच्या आरोग्याचं काही देणे घेणे नाही, असं दिसते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

भारतात येणार ‘कॅन्सर’ची लाट : पोट, तोंडाचे कॅन्सररुग्ण सर्वाधिक

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून …

उशी ठरतेय मान-डोकेदुखीचं कारण

शांत झोप प्रत्येकासाठी आवश्यक असते. पण जर तुम्हाला सकाळी उठल्यावर मानेमध्ये जडपणा, खांदेदुखी, डोकेदुखी किंवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *