Breaking News

3 शिक्षकांचा धरणात बुडून मृत्यू

Advertisements

फिरायला गेलेल्या तीन जणांचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. छत्तीसगढ राज्यातील सोमणी पोलीस ठाण्यातर्गत येणाऱ्या माणगावात ही घटना घडली आहे.

Advertisements

धरणात बुडून मृत्यू झालेले तिघेही शिक्षक असून गोंदियात एका कोचिंग क्लासमध्ये ते शिकवत होते. तिन्ही मृतक नागपूर, भिलाई आणि उत्तर प्रदेश येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.

Advertisements

गोंदियातील सिद्धिविनायक कोचिंग क्लासमध्ये ते शिक्षक होते. काल रात्री फिरायला गेले त्यावेळी तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत शोधकार्य सुरू होते. एन. मिश्रा (भिलाई), अरविंद (उत्तर प्रदेश) आणि अतुल कडू (नागपूर) यांचा समावेश आहे.

शोधकार्यादरम्यान रात्री एक तर आज सकाळी अन्य 2 मृतदेह सापडले असून तिन्ही मृतहेद शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या तिन्ही शिक्षकांच्या मृत्यूनंतर गोंदियात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *