नागपूर- अमरावती मार्गावरील कोंढाळी येथून तिन किमी अंतरावर असलेल्या दोडकी येथील तरुण छायाचित्रकाराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दु:खद घटना रविवारी दुपारी ३.३० चे सुमारास घडली. कार्तिक जयंत अहिरराव (२८) असे आत्महत्याग्रस्त तरुणाचे नाव आहे.
दोडकी येथिल कार्तिक जयंत अहिरराव (२८) हा फोटोग्राफी चे काम करीत होता. त्यातच तिन वर्षे आधी त्याने प्रेमविवाह केला. घरी हलाखीची परिस्थिती असल्याने पत्नी माहेरी सालई या गावी जावून माधवबाग रूग्णालयात काम करून दोन वर्षीय मुलीचा सांभाळ करीत होती. त्यातच त्याला असाध्य रोगाने ग्रासले होते.
एकीकडे व्यवसायात तोटा व बिमारी यामुळे तो पुरता त्रासून गेला होता. त्यामुळे त्याने टोकाची भुमिका घेतली व आज दि. २४/९/२३ चे दुपारी ३.३०चे सुमारास घरातील मयालीस चिधकाच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या वेळी घरात दुसऱ्या कम-यात आइ वडील, आजोबा टिव्ही पाहात बसले होते. त्याच्या रूममध्ये काही तरी पडल्याचा आवाज आल्याने जावून पाहीले असता कार्तिक मृत पडलेला दिसला. कोंढाळी पोलीस तपास करीत आहेत.
विश्वभारत News Website