Breaking News

भंडारा-नागपूर-अमरावती-अकोला राष्ट्रीय महामार्गावर खड्डेच खड्डे : फक्त टोलवसुलीवर भर

Advertisements

अत्याधुनिक मशिन्स, प्रचंड मनुष्यबळ वापरून तयार करण्यात आलेल्या भंडारा-नागपूर-अमरावती – अकोला राष्ट्रीय महामार्ग या विश्वविक्रमी रस्त्यावर अवघ्या दीड महिन्यातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या मार्गाचे डांबरीकरण केवळ विश्वविक्रम नोंदविण्यासाठीच करण्यात आले का?असा सवाल वाहन चालकांसमोर उभा ठाकला आहे. पावसामुळे या मार्गाची अक्षरश: चाळण होऊ लागली आहे.

Advertisements

गेल्या महिन्यात ७ जून रोजी अमरावती – अकोला राष्ट्रीय महामार्गावरील लोणी ते नवसाळापर्यंत विश्वविक्रमी रस्ता उभारण्यात आला. तो केवळ डांबरीकरणापुरताच ठरला. पावसाच्या पाण्याने अवघ्या दीड महिन्यातच या रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात झाली. अनेक ठिकाणी रस्त्यासाठी वापरलेले साहित्य दर्जाहीन असल्याचे दिसून येते. हा रस्ता बांधताना वाहनचालक तसेच परिसरातील गाव, खेड्यातील नागरिकांमध्ये रस्त्याच्या कामाबाबत चर्चेला उधाण आले होते.

Advertisements

राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हा रस्ता नियोजित कालावधीत बांधला तेव्हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने विश्वविक्रमाची घोषणा करताच कंपनीने मोठा आनंद साजरा केला होता. पण, दीड महिन्यातच खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण गायब होऊन गिट्टी ठळकपणे दिसून येत आहे. अजून अर्धाअधिक पावसाळा बाकी आहे. केवळ दीड महिन्यात विश्वविक्रमी रस्त्यावर एक छोटासा खड्डा पडत असेल तरी रस्त्याचे बांधकाम आणि दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याशिवाय राहात नाही.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *