Breaking News

कोतवाल भरती घोटाळा : मोबाइलवरून उत्तरे घेतल्याची ‎आठ आरोपींनी दिली कबुली‎

Advertisements

महसूल विभागातर्फे कोतवाल पदाच्या रिक्त ६९ पदांसाठी आयोजित लेखी‎परीक्षेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या‎ साह्याने कॉपी केल्याप्रकरणी‎ शनिवारी जालना‎ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात‎अाला. यातील आठ जणांना‎ पोलिसांनी अटक केली असून दोघे‎फरार आहेत. अटक आरोपींना‎रविवारी न्यायालयात हजर केले‎असता, त्यांना ३ दिवसांची पोलिस‎ कोठडी सुनावली. मोबाइलवरुन उत्तर‎घेतल्याची त्यांनी कबुली दिली.‎राष्ट्रमाता इंदिरा गांधी महाविद्यालय व‎ सरस्वती भुवन विद्यालयात शनिवारी‎ दुपारी ३ ते ४.३० वाजेदरम्यान हे कॉपी‎ प्रकरण उघडकीस आले होते.‎

Advertisements

ईश्वर परमेश्वर कवडे (२६),‎आकाश इंदलसिंग बहुरे (२२),‎युवराज इंदलसिंग बहुरे (२१),‎किशोर परेश्वर कवडे (२३,‎पिरवाडी), गजानन रतन जगरवाल‎(२६, खडकवाडी), राजेंद्र महासिंग ‎सुंदर्डे (२६, राजेवाडी), अनिल‎देवचंद सुलाने (२२, डाबरगाव),‎अर्जुन अमरसिंग बहुरे (२२,‎सागरवाडी, सर्व ता. बदनापूर),‎आकाश ज्ञानेश्वर गायकवाड ‎‎(भोकरवाडी, ता. जालना) व लखन ‎‎इंदरसिंग जारवाल (बेंबळ्याची‎वाडी, कचनेरजवळ, ता. छत्रपती ‎‎संभाजीनगर) अशी आरोपींची नावे ‎‎आहेत. यातील अर्जुन बहुरे व‎आकाश गायकवाड हे दोन आरोपी‎फरार असून उर्वरित ८ जणांची‎पोलिस कोठडीत रवानगी केली. हे ‎‎आरोपी मोबाइल, कानातील‎मायक्रोस्पाय डिव्हाइस व एका लहान ‎‎डिव्हाइसच्या मदतीने प्रश्नपत्रिकेचे‎फोटो काढून बाहेर पाठवून कॉपी‎करत होते. याप्रकरणी अंबड ‎‎तहसीलमधील अव्वल कारकून‎योगेश वानखेडे व सरस्वती भुवन ‎‎विद्यालयातील प्रयोगशाळा सहायक‎उदय टाकसाळे यांनी पोलिसात‎फिर्याद दिली. बहुरे, जगरवालवर‎मुंबई पोलिस भरतीप्रकरणी गुन्हे‎दाखल आहे.‎
तपासणी सुरू होताच डिव्हाइस फेकले‎‎
पोलिस झडती घेत असल्याचे कळताच अनिल‎सुलानेने मोबाइल व डिव्हाइस हे रस्त्यालगत फेकून‎दिले, परीक्षा केंद्र परिसर व रोडवर शोध घेऊनही ते‎मिळून आले नाही. दरम्यान, ईश्वर, गजानन, राजेंद्र‎व अनिल यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी‎रेल्वे रुळालगत मुक्तेश्वर तलाव येथे उभा असलेला‎मित्र आकाश हा मोबाइलच्या साह्याने उत्तरे सांगत‎असल्याची कबुली दिली. यानुसार आकाशला‎ताब्यात घेतले. त्याच्याकडे मोबाइल मिळाले.‎दरम्यान, त्याने चौकशीत अर्जुनच्या सांगण्यावरून‎उमेदवारांना उत्तरे सांगत असल्याचे सांगितले.‎आरोपींच्या अंगझडतीत मिळाले‎इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, मोबाइल‎ आरोपी ईश्वर कवडेच्या खिशात दोन सिमकार्डचे‎इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, एक मेमरी कार्ड स्लॉट असलेले‎ज्यात व्हीआय कंपनीचे सिमकार्ड व दुसरे एअरटेल‎कंपनीचे सिमकार्ड, छोटा एअरफोन, खिशात‎अाधारकार्ड, सॅमसंगचा मोबाइल व त्यात जिओ‎कंपनीचे सिमकार्ड मिळाले. जगरवालकडून दोन‎सिमकार्डचे डिव्हाइस, मेमरी कार्ड स्लॉट, एअरटेल‎कंपनीचे सिमकार्ड, मायक्रोस्पाय कॅमेरा व वायटी २१०९‎लिहिलेले डिव्हाईस, मोबाइल सापडला.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *