Breaking News

पाईल्सची शस्त्रक्रिया, नागपुरात रुग्णाचा मृत्यू : डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Advertisements

परवाना आणि कोणत्याही आवश्यक सुविधा नसताना डॉक्टरने रुग्णावर पाईल्सची शस्त्रक्रिया केली. त्या रुग्णाचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी महादेवनगर येथील बालाजी पॉलिक्लिनिक अॅण्ड सर्जिकेअरच्या डॉक्टरविरुद्ध गुन्हा सदोष मनुष्यवधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला.

Advertisements

काय झालं?

Advertisements

डॉ. प्रभाशंकर ऊर्फ प्रवाशंकर सुनीलकुमार मिश्रा (रा. लक्ष्मी हाइट्स, दाभा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या डॉक्टरचे नाव आहे. विकास महादेव मेश्राम (वय ४५ रा. लष्करीबाग) असे मृतकाचे नाव आहे. विकास हे ऑटोचालक होते. त्यांना मूळव्याधीचा त्रास होता. ५ जून रोजी ते मिश्रा यांच्या हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी गेले. तपासणीदरम्यान शस्त्रक्रियेचा सल्ला मिश्रा यांनी त्यांना दिला. यासाठी २५ हजार रुपयांचा खर्च येणार असल्याचेही मिश्रा यांनी सांगितले. ७ जूनला विकास हे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सकाळी ९ वाजता त्यांना शस्त्रक्रिया विभागात नेण्यात आले. शस्त्रक्रिया विभागात जात नाही तोच विकास हे जोराने ओरडले. नातेवाइकांनी डॉक्टरांकडे विचारणा केली. बधिरीकरणाचे इंजेक्शन दिल्याने ते ओरडल्याचे मिश्रा यांनी नातेवाइकांना सांगितले. त्यानंतर पुन्हा विकास जोरात ओरडले. मिश्रा यांनी परत तेच उत्तर दिले. ११ वाजताच्या सुमारास आकाश टेंभेकर यांना बोलावून मिश्रा यांनी विकास यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आकाश व विकास यांच्या नातेवाइकांना धक्का बसला. आकाश यांनी वाडी पोलिसांत तक्रार केली. वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *