Breaking News

PM नरेंद्र मोदी आज गोंदियात येणार

Advertisements

PM नरेंद्र मोदी यांचा ५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या मध्यप्रदेशमध्ये दौरा असून, तेथे जाण्यासाठी ते गोंदिया येथील बिरसी विमानतळावर उतरण्याची शक्यता आहे. त्यांच्या या दौऱ्याविषयी गोपनीयता बाळगण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. भाजपासाठी या दोन्ही राज्यांतील निवडणुका महत्त्वाच्या आहेत.

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भाजपा उमेदवारांच्या प्रचारासाठी ५ नोव्हेंबर रोजी दौरा आयोजित करण्यात आला आहे. त्यांचा हा दौरा नेमका मध्यप्रदेशात की छत्तीसगडमध्ये आहे, या विषयी गोपनीयता बाळगण्यात आली आहे. काहींच्या मते पंतप्रधानांचा हा दौरा बालाघाट जिल्ह्यात तर काहींच्या मते छत्तीसगढमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या दौऱ्यासाठी पंतप्रधान दिल्ली येथून विशेष विमानाने बिरसी विमानतळावर येतील व तेथून हेलिकॉप्टरने पुढील दौऱ्यावर रवाना होतील. प्रचार सभेनंतर परत येऊन विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयान करतील. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्ताने बिरसी विमानतळ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *