Breaking News

नागपुरात भाजप नेत्याची हत्या : ग्रामपंचायत निवडणुकीशी संबंध

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील पाचगाव येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पाचगावात भाजप पदाधिकाऱ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. राजू डोंगरे असे हत्या झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. ते भाजपचे नागपूर ग्रामीण सरचिटणीस होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत राजू डेंगरे हे भाजप समर्थित उमेदवार म्हणून निवडून आले होते.

Advertisements

राजू डेंगरे हे पाचगाव येथे ढाबा चालवतात. रात्री तीन वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादातून हॉटेलमधील दोन कर्मचाऱ्यांनी डोंगरे यांच्यावर लाठ्या आणि दगडांनी हल्ला करत त्यांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपींनी काउंटर मधील पैसे आणि मृतकाची कार घेऊन घटनास्थळाहून पलायन केले.

Advertisements

मात्र, नंतर आरोपीच्या कारला अपघात झाला अणि नंतर आरोपींनी विहीरगाव येथील नगनदीच्या पुलाजवळ कार तिथेच सोडून तिथूनही पळ काढला. राजू डेंगरे यांच्या हत्येची माहिती मिळताच भाजप कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. सध्या कुही पोलीस आरोपींचा शोध घेत आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *