टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट
कोराडी। दीवाली अमावस्या ची पूर्व संध्या महादूला कोराडी भागात दिवाळी मिलन निमित्त सर्वधर्म समभाव संगीतमय “लोक जागर 2023” कार्यक्रमाचे आयोजन महादूला नगरवासी व महादुला संघर्ष समितीमार्फत करण्यात आले. सदर कार्यक्रमा मार्फत समाजात जात-धर्म-रंग-रूप-भाषा या आधारावर मतभेद न होता सामाजिक एकता निर्माण व्हावी या हेतूने महादूला नगरवासी या व महादुला संघर्ष समितीने कार्यक्रमाचे आयोजन केले होते शैलेश ढोरे व एंजल बाला म्युझिकल डान्स ग्रुप यांच्या माध्यमातुन संगीतमय लोकनाट्य व गीतांच्या माध्यमातून कार्यक्रमाचे प्रस्तुती कारण केले गेले. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा आ श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी हजेरी लावली या कार्यक्रमात महादुला शहराच्या सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारे कोराडी कोराडी पोलीस, प्राथमिक आरोग्य केंद्र गुमथी, ज्येष्ठ नागरिक संघ, वंचित बहुजन आघाडी, बाजार चौक तसेच झेंडा चौक बुद्धविहार महिला मंडळ, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कामठी, बहुजन समाज पक्ष (कामठी) काँग्रेस पक्ष, भीमपॅंथर, इत्यादी संघटनेचा सत्कार केला गेला. या कार्यक्रमास रत्नदीपजी रंगारी(सा.का.), पन्नालालजी रंगारी(सा.का.), अमरजीतजी गोडबोले (WO-MSPGCL), विजयजी नाईक(व.पो.नि), संजयजी कटकमवार(ESIC समिती सदस्य म.शा) अवंतिकाताई लेकुरवाडे (जिप सदस्य), उत्तमजी कापसे(जिल्हा सह संपर्क प्रमुख शिवसेना-उबाठा), चंद्रगुप्तजी रंगारी(कामठी वि .स अध्यक्ष), सुरेशजी घोरमारे(BYBS – राष्ट्रीय उपाध्यक्ष), किशोरजी चौधरी (सामजिक कार्यकर्ता), मालाताई घोडगे(सरपंच सुरादेवी), भारतीताई शोर(धनगौरी जेष्ठ नागरिक संघ), ममताताई ढोके (महादुला शहर प्रमुख शिवसेना- उबाठा) जितूजी भगत (अध्यक्ष-ओबीसी मोर्चा) रामुजी जामगडे (सामाजिक कार्यकर्ते) मनोजजी सावजी (सामाजिक कार्यकर्ते), कुणालजी भोस्कर (सामाजिक कार्यकर्ते), अक्षयजी मिलन काळे (सामाजिक कार्यकर्ते), विजयजी जैन (सामाजिक कार्यकर्ते), हनुमंताची लष्करे (सामाजिक कार्यकर्ते), भूषणजी ढेंगरे (सामाजिक कार्यकर्ते), सलीम कादीर कुरेशी (सामाजिक कार्यकर्ते), शिवराम जनबंधू (सामाजिक कार्यकर्ते), ज्ञानोबा सोनवणे (सामाजिक कार्यकर्ते), प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सफलते करिता महादुला संघर्ष समिती मार्फत अध्यक्ष-सुधीरजी धुरिया, कार्याध्यक्ष-आकाशजी उके, उपाध्यक्ष-शैलेश गाजघटे, अनिल बोरकर, सचिव-पंकज सोर, सहसचिव- संदिपजी मेश्राम, सुरेंद्र निकोसे, कोषाध्यक्ष – प्रशांत मेश्राम, सह कोषाध्यक्ष – विक्की खिल्लारे, विशाल सोनवणे, विशेष सल्लागार – संतोष शाहू, मंगल सुरडकर, मंगेश भीलावे, अक्षय धनगाये, कार्यकारी सदस्य- संतोष भोंगाळे, सुनील बारस्कर, शेषराव हावरे, विलास कनोजे, अजय जैन, अरुण शेंडे इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक प्रयत्न केले. या कार्यक्रमामार्फत मा आ चंद्रशेखरजी बावनकुडे यांनी उत्तम समजकार्या करीता ते नेहमी पक्ष पात न करता उपस्थीत असल्याचे सांगितले. त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या प्रगतीचे श्रेय जनतेला देत जनतेचा ऋणी असल्याचा दाखला दिला. महादुला संघर्ष समितीच्या समाज कार्याची प्रशंसा करीत महादुला संघर्ष समितीस भावी वाटचाल करीता शुभेच्छा दिल्या तसेच जनतेचा दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.
विश्वभारत News Website