Breaking News

घरकुल, विहिरीच्या फाईलवर सही करण्यासाठी सरपंचाने मागितली लाच

Advertisements

घरकुलाच्या फाईलवर सही करण्याकरिता चार हजार रुपये तसेच तक्रारदार यांच्या नातेवाईकांच्या दोन विहिरीच्या फाईलवर सही करण्याकरिता दहा हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या सरपंचावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केल्याची घटना वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात घडली.

Advertisements

तक्रारदार यांचे एक घरकूल तसेच त्यांचे नातेवाईक यांचे एक घरकुल असे दोन घरकुलाच्या फाईलवर सही करण्याकरिता चार हजार रुपये तसेच तक्रारदार यांच्या नातेवाईकांच्या दोन विहिरीच्या फाईलवर सही करण्याकरिता दहा हजार रुपये लाचेची मागणी ग्रामपंचायत माहुली चे सरपंच व एका खासगी व्यक्ती कडून करण्यात आली. मात्र तक्रारदार यांनी याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागा कडे रीतसर तक्रार दाखल केली. पडताळणी कार्यवाही दरम्यान सरपंच व खासगी व्यक्ती कडून १४ हजार रुपयाची मागणी करून तडजोडी अंती १३ हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले. सापळा कार्यवाही दरम्यान खासगी व्यक्तीने १३ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारली. आरोपी यांचेविरुद्ध पोस्टे मानोरा येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *