Breaking News

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू : खळबळ

Advertisements

मधमाशांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला. मोताळा तालुक्यात खळबळ उडाली असून सणासुदीला मृताच्या परिवारावर संकट कोसळले आहे. रिधोरा येथे शुक्रवारी ही दुर्देवी घटना घडली. सुरेश शिवराम कळमकर ( ४०, रा. रिधोरा, ता. मोताळा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

Advertisements

सुरेश कळमकर गावानजीकच्या आपल्या शेतात जात होते. यावेळी अचानक त्यांच्यावर मधमाशांनी भीषण हल्ला चढविला. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना अत्यावस्थ अवस्थेत मोताळा व नंतर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे कळमकर परिवारावर संकट कोसळले असून सणासुदीला रिधोरा गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *