सत्तेत एकनाथ शिंदे यांना भाजपाने उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर दिली होती. पंरतु, एकनाथ शिंदे यांनी ही ऑफर नाकारली असून मुख्यमंत्री न केल्यास महायुतीमध्ये सरकारचे निमंत्रक बनवावे, कारण निवडणूक त्यांच्या नेतृत्त्वाखाली लढली गेली आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसंच, कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना फडणवीसांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद द्यावे, असाही प्रस्ताव एकनाथ शिंदे यांनी दिल्याचे वृत्त दि न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
