Breaking News

कोरोना आजाराने मयत झालेले वर्धा पोलीस घटकातील पोलीस व यांच्या वारसास पन्नास लाख रुपयाचा धनादेश प्रदान

वर्धा जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :-

वर्धा जिल्हा पोलीस दलातील पोलीस स्टेशन दहेगाव येथे कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार श्री विलास शंकरराव बालपांडे यांचे दिनांक ०२.०९.२०२० रोजी कोरोना या आजाराने दुखद निधन झाले होते.

कोरोना आजाराने कर्तव्यावर हजर असतांना एखादया अधिकारी/कर्मचारी यांचा मृत्यु झाल्यास त्यांचे वारसास पन्नास लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबतचा शासन निर्णय आहे. शहिद झालेल्या पोलीस कर्मचाÚयाच्या वारसांना त्यांचे अडीअडचणीचे काळात आर्थिक मदतीचा हातभार लागावा या अनुषंगाने पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर यांनी पोलीस महासंचालक कार्यालयाशी समन्वय साधुन शहिद झालेल्या कर्मचारी यांच्या वारसांना त्यांच्या मृत्युच्या एक महिन्याचे आत सदर सानुग्रह अनुदान मिळवुन देण्याकरीता प्रयत्न केले.

सदर शासन निर्णयाचे अनुषंगाने कोरोना कर्तव्यकाळात कर्तव्य बजावित असतांना कोरोना विषाणूची लागन होवून शहिद झालेले पोलीस हवालदार विलास बालपांडे यांचे पत्नी जया विलास बालपांडे यांना पन्नास लाख रुपये रकमेचा धनादेश आज दि. ०५-१०-२०२० रोजी पोलीस अधीक्षक श्री प्रशांत होळकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. सदर वेळी मा. पोलीस अधीक्षक श्री होळकर साहेब यांनी शहिद कर्मचारी यांची पत्नी यांना भविष्यात आपणास कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. सदर धनादेश वितरण कार्यक्रमाचे वेळी मा. अपर पोलीस अधीक्षक श्री निलेश मोरे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह), श्री निलेश ब्राम्हणे, पोलीस कल्याण शाखेचे प्रभारी सपोनि प्रविण मुंडे हे हजर होते.

About Vishwbharat

Check Also

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी वाचवले प्राण

वर्धेत धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकलेल्या युवकाचे आरपीएफ पोलीस उपनिरीक्षक व महिला कर्मचारी यांनी …

दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठ, सावंगी आयुर्विज्ञान क्षेत्रातील स्त्री-उद्योजकतेवर कार्यशाळा

वर्धा – दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे इंप्रेण्डिया या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या सांघिक भागीदारी अंतर्गत सावंगी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *