Breaking News

गत 24 तासात 34 कोरोनामुक्त  ; 120 पॉझिटिव्ह

Advertisements

गत 24 तासात 34 कोरोनामुक्त  ; 120 पॉझिटिव्ह

Advertisements

Ø  आतापर्यंत 23,128 जणांची कोरोनावर मात

Advertisements

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 588

चंद्रपूर, दि. 6 मार्च : जिल्ह्यात मागील 24 तासात 34 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 120 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 24 हजार 116 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 23 हजार 128 झाली आहे.  सध्या 588 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 21 हजार 63 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 94 हजार 726 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 400 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 362, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 18, यवतमाळ 16, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या 120 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 28, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपूर सात, भद्रावती पाच, ब्रम्हपुरी तीन, नागभिड एक, सिंदेवाही तीन, मुल दोन, राजूरा सहा,  वरोरा 62 व कोरपना येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करून सुरक्षीत राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Advertisements

About Vishwbharat

Check Also

स्तनाच्या कर्करोगाच्या वेदनादायक आजाराशी झुंजणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रिया

स्तनाच्या कर्करोगाच्या वेदनादायक आजाराशी झुंजणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: ९८२२५५०२२०   मुंबई. बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील …

भारतात येणार ‘कॅन्सर’ची लाट : पोट, तोंडाचे कॅन्सररुग्ण सर्वाधिक

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *