Breaking News

१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना तारखेनुसार मिळणार लस, वेगवेगळया रंगाचे टोकन देणार

Advertisements
१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांना तारखेनुसार मिळणार लस
वेगवेगळया रंगाचे टोकन देणार

चंद्रपूर, ता. ३ : सद्यस्थितीत चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रात १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांकरीता पंजाबी सेवा समिती, तुकूम तसेच रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, रामनगर या २ केंद्रांवर लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या लसीकरण केद्रांत लाभार्थ्यांना मिळालेल्या तारखेनुसार तसेच स्लॉटनुसार कोव्हीन ऍप किंवा आरोग्य  सेतू  ऍपमधील नोंदी प्रमाणे लसिकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.  
२ मे पासून १८ वर्षावरील नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्याची घोषणा मागील महिन्यात केंद्र सरकारने केली. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगरपालिका हद्दीत रविवार, दिनांक २ मेपासून पंजाबी सेवा समिती, तुकूम तसेच रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा, रामनगर या दोन केंद्रावर १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे. उर्वरीत लसिकरण केंद्रांवर ४५ किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ६० टक्के लाभार्थ्याना स्लॉटप्रमाणे तसेच ४० टक्के लाभार्थ्यांना टोकन पध्दतीने प्रथम आलेल्यांना प्रथम या प्रमाणे लसिकरण करण्यात येणार आहे. केंद्रावर विनाकारण गर्दी न करता लसीकरण करणाऱ्या चमूला सहकार्य करावे, असे आवाहन महानगर पालिका प्रशासनाने केले आहे.
प्रत्येक लसिकरण केंद्रावर वेगवेगळया रंगाचे टोकन वितरित करण्याचे प्रस्तावित असून, जसे पिवळया रंगाचे टोकन ९ ते ११ या वेळेकरीता, हिरव्या रंगाचे टोकन ११ ते १ या वेळेकरीता, नारंगी रंगाचे टोकन १ ते ३ या वेळेकरीता तसेच पांढऱ्या रंगाचे टोकन हे ३ ते ५ या वेळेकरीता राहील, म्हणजेच कोणत्याही लसिकरण केंद्रावरती लाभार्थ्यांची गर्दी होणार नाही, असे  आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

Advertisements
Advertisements

About Vishwbharat

Check Also

भारतात येणार ‘कॅन्सर’ची लाट : पोट, तोंडाचे कॅन्सररुग्ण सर्वाधिक

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. दरवर्षी जगभरात एक कोटीहून …

उशी ठरतेय मान-डोकेदुखीचं कारण

शांत झोप प्रत्येकासाठी आवश्यक असते. पण जर तुम्हाला सकाळी उठल्यावर मानेमध्ये जडपणा, खांदेदुखी, डोकेदुखी किंवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *