Breaking News

झुम बराबर,झुम शराबी….! ,दारूसाठी तळीरामांची रेकॉर्डब्रेक गर्दी.सहा वर्षांनी दुकानांचे शटर अप.

झुम बराबर,झुम शराबी….! 
दारूसाठी तळीरामांची रेकॉर्डब्रेक गर्दी.सहा वर्षांनी दुकानांचे शटर अप.
कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
       चंद्रपूर जिल्ह्यात मागील सहा वर्षांपासून दारूबंदी लागू करण्यात आली होती.मात्र याकाळात अवैध दारूविक्रीला कमालीचे उधाण आले होते.जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पाहिजे तेवढी दारू घरपोच दारू उपलब्ध होत असल्याने ही बंदी निव्वळ कागदापुर्तीच सीमित असल्याचे आरोप नागरिकांकडून होत होते.महागडी दारू पिणे परवडत नसल्याने दारू दुकाने सुरू झाली तर बरं होईल अशी भावना व्यक्त होत होती.असे असताना काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील दारुबंदी उठविल्याची घोषणा झाली.यानंतर मद्यप्रेमी व परवाना धारक दारू विक्रेत्यांनी एकच जल्लोष साजरा केला.शेवटी ५ जूलै रोजी प्रतिक्षा संपली आणि दारू दुकानाचे डाऊन शटर अप झाले. जिल्ह्याच्या इतर ठिकाणा बरोबरच गडचांदूर शहरात सुद्धा दारूची दुकाने सुरू झाली आहे. दुकानांना आकर्षकरित्या सजवण्यात आले. कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन दुकानदारांनी “सॅनिटायजर” ठेवले तर “कृपया मास्क लावावे” असे फलक दर्शनी भागात लावलेले दिसले.सहा वर्षांनी दारू दुकाने सुरू झाल्याने तळीरामांनी दुकानांपुढे रेकॉर्डब्रेक गर्दी केल्याचे यावेळी पहायला मिळाले. तळीराम व विक्रेत्यांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण पहायला मिळत असून आता “झुम बराबर झुम शराबी” यानिमित्ताने असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

About Vishwbharat

Check Also

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात सामान्यांना भोपळा मिळणार काय?

महाराष्ट्रात विदर्भाला जोडण्यासाठी तत्कालीन राज्यकर्त्यांनी 28 सप्टेंबर 1953 ला नागपूर करार केला.त्यानुसार यंदाही नागपुरात हिवाळी …

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी कॅन्टीन आणि झुणका भाकर केंद्र

नागपुरातील हिवाळी अधिवेशनात पत्रकारांसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले आहे. पत्रकार ताटकळत उन्हात उभे राहून कार्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *