Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या कामामुळे अधिकारी वैतागले

Advertisements

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यकारभार हाती घेतल्यापासून आता जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र या दोनच महिन्यात मुख्यमंत्री रात्री उशीरापर्यंत बैठका आणि कामकाज करत असल्याने एकनाथ शिंदेंवर अधिकारी वर्ग नाराज असल्याची चर्चा आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री शिंदे हे प्रोटोकॉल पाळत नसल्याने अधिकारी वर्ग त्रस्त आहे. मुख्यमंत्र्यांच्या नियोजित दौऱ्यात अनेकदा परस्पर फेरफार केली जाते. या बदलाची माहिती पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनाही नसते. त्यामुळे सुरक्षेसाठी असलेल्या आणि तैनात असलेल्या पोलिसांनाही ताटकळत उभे राहावे लागते. दिलेल्या वेळेत मुख्यमंत्री शिंदे पोहोचत नाहीत. रात्री उशिरा बैठका, दौरे घेतात. त्यामुळे तो सगळा वेळ अधिकाऱ्यांना काम करत बसावे लागते. यामुळे अधिकारी वैतागले आहेत.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

उपजिल्हाधिकाऱ्याने केला वन जमीन घोटाळा : महसूल मंत्री बावनकुळे कोणती कारवाई करणार?

रायगड जिल्ह्यातील उरण येथील तत्कालीन उपविभागीय अधिकारी (महसूल) राहुल मुंडके यांनी बेकायदेशीरपणे वनांचे शेरे 7/12 …

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *