विश्व भारत ऑनलाईन :
मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून राज्यातील बऱ्याच आयएएस अधिकाऱ्यांना बदलीची प्रतीक्षा आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रशियाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत यासंदर्भात चर्चा केल्याचे समजते. काही मर्जीतील अधिकाऱ्यांची नियुक्ती पुढील आठवड्यात होऊ शकते. तर, यातील काही बदल्या दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे. ठाकरे सरकारच्या मर्जीतील अधिकाऱ्यांना बाजूला करण्याची नियोजन या सरकारचे आहे. अनेक अधिकारी फडणवीस कधी सत्तेत येतात, याची प्रतीक्षा करीत होते.
फडणवीस मुख्यमंत्री असताना…
मागील पाच वर्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. त्यावेळी विविध विकासकामे राज्यात पाहायला मिळाली. यात कार्यक्षम अधिकाऱ्यांचा मोठा वाटा होता. त्यांनी केलेल्या कामामुळे बऱ्याच योजना जनतेपर्यंत पोहचू शकल्या. अशा अधिकाऱ्यांना महत्वाच्या पदावर नियुक्ती देऊन पुन्हा कामाचा धडाका फडणवीस करतील, अशी चर्चा आहे.