Breaking News

कॅन्सरवरील औषधे होणार स्वस्त

Advertisements

 

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

सर्वांना परवडणाऱ्या ३८४ आवश्यक औषधांची यादी तब्बल सात वर्षांनंतर मंगळवारी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी जाहीर केली. या यादीत समावेश करण्यात आल्यामुळे अनेक अँटिबायोटिक्स, कॅन्सर प्रतिबंधक औषधे आणि लशी स्वस्त होतील.

३८४ आवश्यक औषधांच्या नव्या राष्ट्रीय यादीत अंतर्स्रावी, हृदय आणि रक्तनलिकांच्या देखभालीसाठीच्या तसेच गर्भनिरोधक, श्वसन आणि नेत्ररोगाशी संबंधित औषधांचा समावेश करण्यात आला आहे. ‘सर्वांना औषध, स्वस्त औषध या संकल्पनेअंतर्गत आवश्यक औषधांची राष्ट्रीय यादी सर्व स्तरांवर स्वस्त आणि गुणवत्तापूर्ण औषधांना प्रोत्साहन मिळून नागरिकांना आरोग्याच्या देखभालीसाठी कमी खर्च करावा लागेल,’ असे ही यादी जाहीर करताना मांडवीय म्हणाले.

Advertisements

रॅनिटिडिन, सुक्रालफेट, व्हाइट पेट्रोलेटम, एटेनोलॉल आणि मेथिल्डोपासारख्या २६ औषधांना तुलनेने चांगल्या औषधांच्या उपलब्धतेच्या आधारावर यादीतून बाहेर काढण्यात आले आहे. यादीतील औषधांच्या २७ श्रेणी करण्यात आल्या आहेत. आवश्यक औषधांची राष्ट्रीय यादी सर्वप्रथम सन १९९६मध्ये तयार करण्यात आली. आत्तापर्यंत त्यात २००३, २०११ आणि २०१५मध्ये तीन वेळा दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.

ही औषधे स्वस्त होणार

– इव्हरमॅक्टिन, मुपिरोसिन सारख्या संसर्गप्रतिरोधक औषधांसह ३४ नव्या औषधांचा समावेश आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

उकाड्यामुळे वकिलांना ड्रेसकोडमधून सवलत?

मागील मंगळवारी (१६ एप्रिल) वकिलांनी परिधान करावयाच्या कपड्यांविषयी कर्नाटक हायकोर्टाने एक परिपत्रक जारी केले आहे. …

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय!

जानिए मनचाही संतान प्राप्ति के लिए नैसर्गिक नियमों का परिपालन और उपाय! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *