Breaking News

उद्धव ठाकरेंचे अस्तित्व मातोश्रीपुरतेच-नारायण राणे यांची घणाघाती टीका

विश्व भारत ऑनलाईन :

”उद्धव ठाकरेंचे सरकार पायउतार होताच त्यांचे अस्तित्व संपले. यापूर्वीही त्यांचे केवळ मातोश्रीच्या कक्षेतच अस्तित्व होते. देशात आणि राज्यात त्यांचे अस्तित्वच नाही,” असा घणाघात केंद्रीय केंद्रीय लघु, सूक्ष्म मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर केला.

शिंदेंनाच परवानगी

चित्ता देशात उपलब्ध नव्हते ते पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे आले आहेत, तर अशा चांगल्या गोष्टीचे कौतूक करायला हवे, पण उद्धव ठाकरे चांगले बोलणार नाहीत. शिंदेंनाच दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळणार आहे. धनुष्यबाणही हे चिन्हही शिंदे गटालाच मिळणार आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याला माझ्या शुभेच्छा आहेत.

नाणार येथेच

नाणार रिफायनरीसाठी जी जागा पहिले ठरली तेथेच नाणार प्रकल्प होणार आहे. तिथे मी कुणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. नाणार हा मोठा प्रकल्प हातून जाऊ नये यासाठी आम्ही संबंधित मंत्र्यांना आणि कंपनीशी बोललो आहे. आमचे केंद्रीय मंत्री कंपनीला कन्व्हेन्स करू शकतील असा विश्वास वाटतो.

शिवसेना अस्तित्वहीन

भाजपचे सध्या 303 खासदार असून त्यात वाढ होऊन 2024 मध्ये 404 खासदार करण्याचा आमचा निश्चय आहे. जिथे आमच्याविरोधात जे खासदार निवडून आले त्या ठिकाणी आम्ही प्रचार करणार आहोत. शिवसेनेचे साऊथ गोवा आणि मुंबईत भाजपचेच खासदार निवडून येणार आहेत. शिवसेनेचे दोनही खासदार निवडूण येणार नाहीत.

About विश्व भारत

Check Also

PM मोदी को गाली देने वाला मामला : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का बड़ा बयान

PM मोदी को गाली देने वाले मामले पर एकनाथ शिंदे का बड़ा बयान टेकचंद्र सनोडिया …

महसूल मंत्री बावनकुळेंच्या कामठी-मौदात मतचोरी : राहुल गांधींच्या आरोपानंतर ३ सप्टेंबरला थेट…

ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ज्या मतदारसंघाचा उल्लेख करत मतचोरीचा आरोप भाजप आणि निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *