Breaking News

‘जलयुक्त शिवार’ची चौकशी बंद : देवेंद्र फडणवीस

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने सुरु केलेली जलयुक्त शिवार योजनेची चौकशी बंद करण्यात येणार आहे. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. जलयुक्त शिवारच्या ज्या कामांमध्ये गडबड नाही व केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या,त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार आहे. पण, जेथे चुकीचे झाले तिथली चौकशी सुरू राहील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Advertisements

देवेंद्र फडणवीस हे शनिवारी विविध कार्यक्रमांसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अजित पवार यांनी या चौकशीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर प्रश्न विचारला असताना फडणवीस यांनी ज्या कामांमध्ये गडबड नाही व केवळ राजकीय दृष्टीकोनातून प्रेरित होऊन चौकशा केल्या जात होत्या त्या सर्व कामांची चौकशी बंद केली जाणार असल्याचे सांगत आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र संशय असलेल्या ठिकाणची चौकशी सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शासकीय रुग्णवाहिकेला(ऍम्ब्युलन्स)ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

अजित पवारांचा मारेकरी सापडला : मोठी बातमी

अजित पवार यांच्या अपघाताबाबत वारंवार शंका उपस्थित केल्या जात आहेत. आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *