Breaking News

“…कुणी तहसीलदार देता का तहसीलदार”

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :

Advertisements

‘नटसम्राट’ या प्रसिद्ध नाटकात ‘कुणी घर देता का घर’ हे वाक्य सर्वपरिचित आहे. अशाच प्रकारचे वाक्य जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्याला लागू पडतेय. या तालुक्याला तहसीलदार नाही. बोदवडच्या जनतेला”…तहसीलदार देता का तहसीलदार” नटसम्राटमधील वाक्याप्रमाणे बोलण्याची वेळ आली आहे.

बोदवड येथील तहसील कार्यालयात तहसीलदार मिळत नसल्याने राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील एकाने चक्क सरण रचून आमरण उपोषण सुरू केले आहे.ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी नागरीकांना तहसीलमध्ये कामासाठी यावे लागत असल्याने रीक्त पदावर तहसीलदारांची त्वरीत नियुक्ती करण्याची मागणी निवेदनाव्दारे रहिवासी प्रमोद धामोडे यांनी केली होती. पूर्णवेळ तहसीलदार नसल्यामुळे वृद्ध, अपंग व निराधार नागरीकांना तसेच पुरवठा शाखेमध्ये विविध कामांसाठी येणार्‍या ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत होती. याबाबत बर्‍याच वेळा विविध पक्षामार्फत तसेच संघटनांमार्फत वारंवार निवेदने देण्यात आली. मात्र याबाबत वरीष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात न आल्याने सोमवार, दि. 19 पासून बोदवड तहसील कार्यालयाबाहेर पूर्णवेळ तहसीलदारांची नियुक्ती होत नाही, तोपर्यंत सरणावर झोपून आमरण उपोषणास कायम ठेवणार असल्याचा इशारा धामोडे यांनी दिला आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

1 रुपयांचेच वेतन घेतो IAS अधिकारी : वाचा

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे? अशा प्रश्नांची उत्तरे …

वनकर्मचारी निलंबित : ‘ईव्हीएम’चे व्हाट्सअप स्टेटस भोवले

चंद्रपूर-वणी- आर्णी लोकसभा मतदार संघातील पांढरकवडा वनविभागाच्या एका कर्मचाऱ्याला इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन अर्थात ‘ईव्हीएम’च्या कार्यक्षमतेवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *