Breaking News

खडसे घेणार फडणवीसांची भेट..चर्चाना उधाण

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंच्या बाबतीत बोलताना मोठा दावा केला. खडसे यांनी देवेद्र फडणवीस यांना आपण तिघं बसून जे काही आहे ते सगळं मिटवून टाकू,असे सांगितल्याचे गिरीश महाजन म्हणाले. यावर खुद्द आमदार खडसे यांनी आता आपली बाजू मांडली. ते म्हणाले “मी देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांची भेट घेणार आहे. नाशिक मध्ये एका कार्यक्रमात मी देवेंद्र फडणवीस यांची भेट मागितली. त्यावर फडणवीस म्हणाले पुढच्या आठवड्यात मी तुम्हाला कळवतो. मी त्यांना भेटणार आहे, असं खडसे म्हणाले.

Advertisements

भाजप नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याबाबतचे एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट केले आहेत. यावर आता एकनाथ खडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, आता मिटवायचं काय राहिलं? सर्व प्रकारे तर त्रास देण्याचे सुरूच आहेत. ईडी सुरू आहे. सीबीआय सुरू आहे. या सर्व चौकशींना मी समर्थपणे सामोरं जाणार आहे, असं खडसे म्हणालेत. तसेच गिरीश महाजन यांनी म्हटलं की, रक्षा खडसेंनी मला सांगितलं अमित शहा यांच्या ऑफिसबाहेर तीन तास बसून ठेवलं. भेट झाली नाही. याबाबत मी रक्षा खडसेंना विचारलं असता अशा प्रकारे कुठलीही चर्चा महाजनसोबत मी केली नाही, असं रक्षा खडसेंनी मला सांगितलं, असंही खडसे म्हणालेत.

Advertisements

खडसेंची ऑफर काय?

नाशिकच्या अखिल भारतीय महानुभाव संमेलनात एकनाथ खडसे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्याजवळ आले होते. यावेळी खडसेंनी फडणवीसांना सोबत बसून जे काही असेल ते मिटवून टाकू, जाऊ द्या, अशी ऑफर दिली. सध्या त्यांचं काय ते चाललेलं आहे. त्यांच्या मनात काय मिटवायचं होतं ते कळलं नाही. कारण त्या ठिकाणी गर्दी इतकी होती आणि गोंधळ इतका होता त्यामुळे मी त्यांना विचारलं नाही, असं गिरीश महाजन यांनी सांगितलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विपक्षी इंडिया प्रणीत की जीत की संभावना को लेकर घबराया राजनेता और कट्टर हिन्दू समाज

विपक्षी इंडिया प्रणीत की जीत की संभावना को लेकर घबराया राजनेता और कट्टर हिन्दू समाज …

नितीन गडकरी प्रचार नही करेंगे?भाषण के दौरान चक्कर

भाषण के दौरान केंद्रीय मंंत्री नितिन गडकरी को चक्कर आया और बेहोश होकर गिर पड़े? …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *