Breaking News

वाळूचा ट्रक सोडण्यासाठी लाच : नायब तहसीलदार अटकेत

Advertisements

विश्व भारत ऑनलाईन :
वाळूचा ट्रक सोडण्याच्या प्रकरणात नायब तहसीलदाराला १८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई सोमवारी सायंकाळी अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तहसील कार्यालयात केली. शंकर महादेवराव श्रीराव (५४) असे लाचखोर नायब तहसीलदाराचे नाव आहे. अचलपूर तहसीलच्या हद्दीतून वाळू घेऊन जाणारा एक ट्रक श्रीराव यांनी २ ऑक्टोबरला पकडला होता. त्यावेळी कारवाई न करण्यासाठी त्यांनी ट्रक मालकाला २० हजार रुपये लाच मागितली होती. मात्र ट्रक मालकाने रक्कम नंतर देतो असे सांगितल्यामुळे श्रीराव यांनी ट्रक कारवाई न करता सोडला होता.

Advertisements

या प्रकरणी ट्रक मालकाने एसीबीकडे तक्रार केली होती. तक्रारीवरून एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. पडताळणीदरम्यान लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. तसेच सोमवारी लाच स्वीकारण्याचे ठरले होते. त्यामुळे एसीबीच्या पथकाने सोमवारी सायंकाळी अचलपूर तहसील कार्यालयात सापळा रचला. याच दरम्यान ट्रक मालकाकडून १८ हजार रुपये लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने श्रीरावला रंगेहाथ पकडले.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!

कोराडी-660 MW तापीय विद्युत केंद्र में हादसा!8 घायल!   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नागपुर …

अप्पर जिल्हाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल : खाण मालकांकडून घ्यायचा पैसे

अपर जिल्हाधिकारी प्रमोद गायकवाड यांच्यावर अकोला शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *