भाजप समर्थक आमदार रवी राणा विरुद्ध शिंदे गटाचे समर्थक आमदार बच्चू कडू हा वाद विकोपाला गेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवी राणा यांच्यात आज बैठक पार पडली. यानंतर रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये सागर बंगल्यावर एक बैठक होईल.
बच्चू कडू काय म्हणाले?
रवी राणा यांनी जी बदनामी केली त्यावर आजच्या बैठकीत आमचं समाधान झालं नाही तर आम्ही राणाला फुटण्यासारखं फोडून काढू. तसंच एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहायचं की नाही याबाबत बैठकीत काय नेमकी चर्चा होते, ते बघून आम्ही निर्णय घेऊ. आमदारांनी पैसे घेतले नाही, हे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पण सत्तेतील आणि घरातील माणूस जेव्हा आरोप करतो तेव्हा नाराजीचा सूर असणारच आहे असेही कडू म्हणाले.
…नाहीतर गेम
अपक्ष आमदारांचाही मला पाठिंबा आहे. कार्यकर्त्यांचे मत आहे की सरकार मधून बाहेर पडावं. आपला गेम होईल अशा पद्धतीचे संदेश कार्यकर्ते पाठवत आहे. पण या बैठकीत काय होणार त्यानंतर निर्णय घेऊ. कार्यकर्त्यांचे मन दुखलं आहे. कार्यकर्त्यांमध्ये भीतीच वातावरण आहे. आपल्या नेत्याचं गेम तर होणार नाही ना? त्यामुळे ते मेसेज करत आहे. उद्या कार्यकर्ते- आमची बैठक आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय.