Breaking News

पोलीस भरती टप्याटप्याने? : वय झालेल्या युवकांनाही संधी

विश्व भारत ऑनलाईन :

पोलीस भरतीला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यात करोनाकाळात वयोमर्यादा पूर्ण झालेल्या तरुणांना पुन्हा संधी मिळावी आणि सर्व प्रवर्गातील तरुणांचा समावेश व्हावा, या उद्देशाने अटीमध्ये बदल केला जाऊ शकते. विशेषत: मराठा आरक्षण रद्द झाल्याचा फटका या भरतीला बसू नये, असाही प्रयत्न असल्याचे समजते.

पोलीस भरतीला स्थगिती देण्यात आल्याने तरुण वर्गात संतप्त प्रतिक्रिया उमटली. तरुणांनी यावरून समाजमाध्यमांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली. २०२१ मधील पोलीस शिपाई संवर्गातील जाहिरात देण्याबाबतची पुढील कार्यवाही प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत असल्याच्या सूचना महासंचालक कार्यालयातील प्रशिक्षण व खास पथके या विभागामार्फत देण्यात आली. तसेच ही जाहिरात देण्याबाबतचे यथावकाश कळविण्यात येईल, अशा सूचना राज्यातील सर्व पोलीस विभागांना देण्यात आल्या होत्या. भरतीबाबतची ही जाहिरात १ नोव्हेंबरला काढण्यात येणार होती. राज्यभरात रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती प्रक्रिया करण्यात येणार होती.

भरती टप्याटप्याने?

जवळपास १४ हजार ९५६ पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार होती. मात्र करोनाकाळात भरती होऊ न शकल्याने वय उलटलेल्या उमेदवारांना संधी मिळावी, हा पोलीसभरतीमागील स्थगितीचा सरकारचा उद्देश असल्याचे बोलले जात आहे. तसचे जातनिहाय भरतीबाबत फेरआढावा घेण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील अधिकाधिक तरुणांना या भरतीत सहभाग घेता यावे, या उद्देशाने अटी-शर्तीमध्ये बदल करण्याबाबत विचार सुरू आहे. त्यासाठी गरज पडल्यास टप्प्याटप्प्यानेही भरती करण्यात येऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले. याबाबत लवकरच उच्चस्तरीय बैठकीत निर्णय होऊ शकतो.

About विश्व भारत

Check Also

जिल्हाधिकाऱ्यांविरोधात महिला IAS अधिकाऱ्याची तक्रार

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मिळालेल्या …

२ तहसीलदार, १ उपजिल्हाधिकारी निलंबित : नागपूर हायकोर्टात कोणते प्रकरण पोहचले? वाचा

भंडारा आणि पवनी तालुक्यात रिक्त असलेल्या ४८ पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया २०२३ मध्ये राबविण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *