Breaking News

नागपुरात तलाठ्याने घेतली लाच : रेती तस्करीत मंडळ अधिकारी,2 तलाठी निलंबित

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील रुयाड येथील तलाठी प्रफुल मानिकराव झाडे (वय 45) यास फेरफार करून देण्यासाठी 3 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली.

Advertisements

वरिष्ठ अधिकाऱ्यांना फेरफारचे पैसे देण्यासाठी तलाठ्याने पैसे मागितल्याची चर्चा आहे. पुन्हा एकदा कनिष्ठ कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात आल्याने वरिष्ठ मोकाट राहत असल्याचे दिसून येते.

Advertisements

मंडळ अधिकारी, तलाठी निलंबित

तर, दुसरीकडे रेतीतस्करीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील मंडळ अधिकारी पी. बी. कांबळे व तलाठी आय. जी. चव्हाण आणि तलाठी डी. बी. चव्हाण यांना निलंबित करण्यात आले आहे. रेती तस्करांसोबत साठेलोटे असल्याचा संशय तहसीलदार महागाव यांना आला.

त्यानुसार त्यांनी उपविभागीय अधिकारी उमरखेड आणि जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठविला. त्यावर कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. उत्तर असामाधानकारक असल्याने निलंबन करण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकारी पैशाची मागणी करतात आणि कनिष्ठ कर्मचारी भरडले जात असल्याचे दिसते.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

साली बनकर लडकी की ‘सेक्सी’करतूत!

सावधान: लडकी की करतूत’साली’ बनकर बात कर रहा था ठग!   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत 

हत्यारा खूनी डंपर-टिप्पर की चपेट मे 6 लोगों की दर्दनाक मौत टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *