Breaking News

नागपुरची सफर 100 रुपयांत : मेट्रोची प्रवाशांना भेट

मेट्रो सेवेचा नागपूरकरांना चांगला फायदा झाला आहे.अनेकांचा प्रवास सुखकर झाला आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी महामेट्रोकडून चांगली सेवा देण्यासह विविध सुविधा दिल्या जात आहेत. आता अशीच एक घोषणा मेट्रो प्रशासनाने केली आहे. यामध्ये केवळ 100 रुपयांत नागपूरकरांना एक दिवस मेट्रोने शहरात कुठेही फिरता येईल. या दैनिक पास योजनेमुळे प्रवासी आणि पर्यटकांना 100 रुपयांत नागपूर दर्शन होणार आहे.

विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत

नागपूर मेट्रोला प्रवाशांचा चांगाला प्रतिसाद आहे. मात्र, प्रशासनाने तिकिटांच्या दरात वाढ केली होती. त्याच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्यानंतर मेट्रोने विद्यार्थ्यांना 30 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. बारावी, पदवी, पदविका, आयआयटी, पॉलिटेक्निक व इतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासी भाड्यात ही सवलत मिळत आहे. सर्व मेट्रो भाड्यामध्ये या सवलतीचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.

About विश्व भारत

Check Also

प्रेयसीचा खून करून नागपुरजवळील रामटेकच्या जंगलात पुरला मृतदेह

लग्नाचा तगादा लावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून करून तिचा मृतदेह नागपूरजवळील जंगलात पुरला. ही घटना मंगळवारी …

BJP प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या मुलाच्या कारची पाच वाहनांना धडक : नागपुरात खळबळ

महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाच्या मोठ्या नेत्याच्या मालकीच्या ऑडी कारने शहरात मध्यरात्री हैदोस घातला. दुचाकी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *