Breaking News

उपमुख्यमंत्र्यांच्या शहरात हजारा हून अधिक झाडांची कत्तल : नागपूर मनपा अनभिज्ञ

Advertisements

नागपूर शहरातील नारा परिसरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने (बिल्डर) इमारत बांधण्यासाठी एक हजार हून अधिक झाडे कापली आहेत. विशेष म्हणजे नागपूर महापालिकेला याची माहितीही नव्हती. एका पर्यावरणप्रेमीच्या तक्रारीनंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शहरात ही घटना घडली आहे.

Advertisements

कोण आहे बिल्डर?

Advertisements

जेरी प्रॉफिट ग्रुप नावाच्या बिल्डर कंपनीची नारा स्मशानभूमीजवळ 5 एकर जमीन आहे. येथे इमारत बांधण्यासाठी बिल्डरकडून गेल्या दहा ते बारा दिवसांपासून झाडे कापण्यात येत आहेत. आतापर्यंत एक हजार हून अधिक झाडे कापण्यात आली आहेत. त्याचबरोबर आणखी अनेक झाडे कापण्यात येणार आहेत. नागपूरचे वृक्षमित्र सचिन खोब्रागडे यांच्या तक्रारीनंतर ही बाब उघडकीस आली. तपासाअंती संबंधितांवर पोलीस तक्रारही करण्यात येणार आहे.

हेरिटेज झाडेही कापली

हा प्रकार उघडकीस आल्यानंतर महानगर पालिकेच्या उद्यान विभागात एकच खळबळ उडाली आहे. तक्रार मिळाल्यानंतर उद्यान विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. या बेकायदेशीर तोडणीत 20हून अधिक हेरिटेज झाडेही कापली गेल्याची पुष्टी त्यांनी केली. त्यासोबतच यात बाभळीच्या झाडांची संख्या सर्वाधिक आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

जिल्हाधिकारी डॉ. इटनकर कुणावर करणार कारवाई : नागपुरात मतदान कमी होण्यासाठी जबाबदार कोण?

लोकसभा निवडणुकीत मतदार यादीत नावे नसल्याने नागपुरातील लाखो मतदार मतदानापासून वंचित राहिल्याबद्दल सार्वत्रिक ओरड होत …

नागपुरात रेल्वे एक्सप्रेसमध्ये तरुणीसोबत केले अश्लील चाळे

गीतांजली एक्सप्रेसमध्ये विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेतले. विनोद सलगे (३५) रा. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *