Breaking News

सावरकर ‘लक्ष्य’, उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला पाठिंबा : मोहन कारेमोरे यांचा गंभीर आरोप

Advertisements

मविआची जाहीर सभा रविवारी नागपुरातील नंदनवन, दर्शन कॉलनी मैदानावर होणार आहे. राज्याचे माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांनी एक वादग्रस्त विधान केले. “बलात्कार हे एक राजकीय हत्यार, ते आपल्या विरोधकांच्या विरोधात वापरा, असे सावरकरांचे विचार होते” असा दावा शिवानी वडेट्टीवार यांनी एका जाहीरसभेत केला. भाजपने या आरोपांचा समाचार घेतला. काँग्रेस नेत्याकडून आलेल्या या वक्तव्यामुळे आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. ‘वज्रमूठ’ सभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून पुन्हा सावरकरविरोधी वाद उकरून काढण्यात येत असल्याचे दिसत आहे.

Advertisements

चंद्रपूरमधील एका कार्यक्रमात शिवानी वडेट्टीवार यांनी हे विधान केल्यानंतर खळबळ माजली. हा विषय फार गंभीर आहे, असे मला वाटत नसल्याची प्रतिक्रिया विजय वडेट्टीवार यांनी दिली. सावरकर यांच्या एका पुस्तकातील हा संदर्भ असल्याचे शिवानी यांनी आपल्याला सांगितल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ती पुस्तकाचा आधार घेऊन बोलली असेल, तर त्यावर वाद होण्याचे काहीच कारण नाही. पण मला माहिती नाही की ती कोणत्या संदर्भात बोलली आहे. ती स्वत: वकील आहे. त्यामुळे तिला वाचनाचाही मोठा छंद आहे. कुठल्यातरी पुस्तकाचा तिने संदर्भ घेतला व ते तिचे तिचे मत आहे, असे ते म्हणाले.

Advertisements

हिंदू महासभा आक्रमक

आता अखिल भारत हिंदू महासभेने यात उडी घेतली असून लवकरच कायदेशीर प्रकिया करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे यांनी दिली. तसेच वेळ आल्यास शिवानी वडेट्टीवार यांच्याविरोधात पोलीस तक्रारही करण्यात येईल, असेही कारेमोरे यांनी सांगितले. तर जाणीवपूर्वक सावरकर यांना काँग्रेस लक्ष करीत आहे. आगामी सर्व निवडणुकीत याचा फटका काँग्रेसला बसेल. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आता गप्प का? असा सवाल कारेमोरे यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसच्या सावरकरविरोधातील वक्त्यव्याला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे, असा दावा कारेमोरे यांनी केला आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

रामटेकमध्ये सेनेचा पराभव होण्याची भीती? भाजपचा ‘प्लॅन’ काय आहे?

रामटेक लोकसभा निवडणुकीत महायुतीचा पराभव होतोय, अशी शक्यता महायुतीच्याच अंतर्गत सर्वेक्षणातून वर्तवली आहे. पक्षाचा पराभव …

“बड़बड़ करने वाले की जगह क्या है, बताने की जरूरत नहीं”, उद्धव ठाकरे पर देवेंद्र फडणवीस का बड़ा हमला

“बड़बड़ करने वाले की जगह क्या है, बताने की जरूरत नहीं”, उद्धव ठाकरे पर देवेंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *