Breaking News

11 मे नंतर महाराष्ट्रात नवं सरकार : कायदे तज्ज्ञाचा मोठा दावा

Advertisements

राज्यातील सत्तासंघर्ष निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडणार याबाबत राजकीय विश्लेषक अनेक अंदाज वर्तवत आहेत. ‘विश्व भारत’ ने यासंदर्भात अंदाज वर्तविले होते.

Advertisements

हे सर्व घडत असतानाच कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी केलेल्या एका ट्विटने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.

Advertisements

कायदेतज्ञ असीम सरोदे यांनी ट्विटमध्ये एक मोठा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी हे 10 मेच्या आधी नक्की होतील, असा दावा त्यांनी केला आहे. या बरोबरच राज्यात नवीन सरकार स्थापनेबाबतही त्यांनी मोठा दावा केला आहे. 11 मे नंतर नवीन सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग येणार हे सुद्धा नक्की, असं असीम सरोदे ट्विटमध्ये पुढे म्हटलं आहे.

खासदार शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ माजली आहे. पवारांच्या या निर्णयाचे पडसाद महाविकास आघाडीतही उमटले आहेत. या दरम्यान काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटातला सुसंवाद चांगलाच वाढला आहे.

दुसरीकडे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही एक मोठा गौप्यस्फोट केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचं भाजपसोबत बोलणं सुरू आहे असं त्यांनी म्हटलं होत. यानंतर आता असीम सरोदे यांच्या या ट्विटनेही लक्ष वेधलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं काय घडतं? हे पाहणं फार महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *