Breaking News

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास नकार देणाऱ्या बँकावर त्वरित कारवाई करा : देवेंद्र फडणवीसांचे आदेश

शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करणाऱ्या बँकांविरोधात आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. अशा बँकांवर कारवाई करण्याचे आदेश देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

या बैठकीत बँका पीक कर्ज नाकारत असल्याने फडणवीस यांनी आधिकाऱ्यांना थेट कारवाईच्या सूचना केल्या आहेत. जर बँका राज्य सरकारची धोरणं ऐकत नसतील तर त्यांना फटका दिल्याशिवाय जमणार नाही. एकतरी एफआयआर दाखल करावा जेणेकरून बँकाना समज मिळेल असेही फडणवीस यांनी सुनावले आहे.

जलयुक्त शिवारच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झाली आहे अशी माहीती फडणवीस यांनी यावेळी दिली. यावेळी प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. यामुळे आता गाळमुक्त धरण, गाळमुक्त शिवार योजनेला गती प्राप्त होणार आहे. जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणार असे आश्वासन देखील त्यांनी दिले. शेतकऱ्यांना १२ तास वीज देण्यासाठी सोलर योजना आणण्यात येत आहे. अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

About विश्व भारत

Check Also

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणितात कच्चे : म्हणाले…!

राजकीय चाणक्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची ओळख होती. परंतु अलीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री …

चंद्रपूर जिल्ह्यात सेवा देण्याऱ्या IPS अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू

IPS दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी डॉ .सुधाकर पठारे यांचा तेलंगणामध्ये रस्ते अपघातात मृत्यू झाला. ते …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *