Breaking News

नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी नगरपंचायतीत भ्रष्टाचार : मुख्याधिकारी, अभियंत्यांचे दुर्लक्ष-डॉ. इरफान अहमद यांचा आरोप

Advertisements

✍️मोहन कारेमोरे

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी नगरपंचायत अंतर्गत सध्या करोडो रुपयाचे काम सुरू आहे. या कामावर नगरपंचायतच्या अभियंत्यांसह मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांचे दुर्लक्ष होत आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ता डाॅ. इरफान अहमद यांनी व्यक्त केले.

Advertisements

मागील पाच वर्षांपूर्वी पारशिवनी ग्रामपंचायतला नगरपंचायतचा दर्जा मिळाला. नगरपंचायतचा दर्जा मिळाल्यानंतर येथे निवडणुका झाल्या. पारशिवनी नगरपंचायतला नवा मुख्याधिकारीही मिळाला. गेल्या तीन वर्षापासुन नगर विकास मंत्रालयाकडून मोठ्या प्रमाणात पारशिवनी शहराला विकास निधीही मिळाला. या सर्व कामाची पाहाणी केली असता कोणतेही काम हे उत्कृष्ट दर्जाचे झाले नसल्याचा दावा डाॅ. इरफान अहमद यांनी केला आहे. याकडे स्थानीक प्रशासन व लोकप्रतिनीधी यांचे दुर्लक्ष होत असल्याची जनमानसात चर्चा आहे.

मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांच्या कार्यकाळात पारशिवनी शहरवासी अनेक समस्यांना तोंड देत आहेत.सध्या पारशिवनी तहसील ते मुख्य बाजारपेठ या सिमेंट रस्त्याचा कडेला होत असलेल्या सिमेंटीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचे होत आहे. या कामात सिमेंटचे प्रमाण कमी असुन व्हायब्रेटर रोलर लावणे आवश्यक होते. मात्र,संबंधित कंत्राटदार हा साधा रोलर लाऊन काम करीत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते डाॅ. इरफान अहमद यांनी नगरपंचायतचे अभीयंता सौरभ कावळे यांना विचारले असता, हेकेखोरीच्या भाषेत बोलत मला जिल्हाधिकारी डाॅ.विपीन इटनकर यांनी मंगळवार व शुक्रवार हे दिवस पारशिवनीकरीता दिलेले आहे. असे सांगीतले. पण जेव्हा त्यांना भ्रमणध्वनीद्वारे विचारले, तेव्हा या कामावर अभियंता सौरभ कावळे उपस्थीत नव्हतेच. पण त्यांचे तांत्रिक कर्मचारी, कंत्राटदार व नगरपंचायतचे कोणतेही कर्मचारी या कामावर उपस्थीत नव्हते. इतके होऊनही नगरपंचायतच्या मुख्याधिकारी अर्चना वंजारी दुर्लक्ष करीत आहे.

काम करोडोचे, मात्र…

सध्या पारशिवनी तहसील कार्यालय ते मुख्य बाजारपेठ दरम्यान मुख्य सिमेंट काॅक्रीटच्या दोन्ही बाजुला सिमेंट काॅक्रीटच्या अस्तरीकरणाचे काम अंदाजीत 1 कोटी 70 लक्ष रुपयाचे मंजुर आहे. या कामावर एक क्युबीक मिटर करीता साडे चार बॅग सिमेंटचा वापर करणे आवश्यक आहे. पण दोन क्युबीक मीटर करता फक्त सहा बॅग सिमेंट वापरण्यात येत आहे. या कामात व्हायब्रेटर रोलरचा वापर कुठेही होत नसल्याचे सध्या दिसुन येत आहे. असे निकृष्ट दर्जाचे काम सध्या पारशिवनी नगरपंचायत मध्ये सुरु आहे. शहरवासीयांमध्ये कमालीचे नैराश्याचे वातावरण निर्माण झालेले आहे.

*”पारशिवनी नगरपंचायत अंतर्गत होत असलेली कामे निकृष्ट दर्जाची होत असुन, याकडे मुख्याधिकारी अर्चना वंजारी यांचे कुठेही लक्ष नाही. त्याचप्रमाणे कोणत्याही अभियंता व कर्मचाऱ्यांवर त्यांचे लक्ष नाही. हेही तितकेच खरे ! या दुर्लक्षित कामाकरीता पारशिवनी शहरवासी लवकरच आंदोलनाचा पवित्रा उचलणार आहेत.”*
-डाॅ. इरफान अहमद,सामाजिक कार्यकर्ता,पारशिवनी

“शहराच्या विकासाला चालना मिळावी, याकरीता नेहमी शहरवासी तत्पर असतात. मात्र अशा निकृष्ट दर्जाच्या कामामुळे पारशिवनीची प्रतिमा खराब येत आहे. याकडे स्थानीक लोकप्रतीनीधी व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे. “*
-मो.अफरोज खान,माजी महासचिव, रामटेक लोकसभा युवक काॅग्रेस

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष चर्चा

नागपुर आगमन पर RSS प्रमुख मोहन भागवत की शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती के साथ विशेष …

अनियंत्रित कार नदीत कोसळली; दोन जण जागीच ठार

अनियंत्रित कार नदीत कोसळली; दोन जण जागीच ठार टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट नागपुर। कळमेश्वर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *