Breaking News

अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती कार्यक्रमात स्टंटबाजीचा प्रयत्न : भाजप नेत्याने राष्ट्रवादीला केलं आरोपीच्या पिंजऱ्यात उभं

Advertisements

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे रोजी होणाऱ्या जयंतीवरून भाजप आमदार राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. तसेच रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवरही राम शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार रोहित पवार हे जाणीवपूर्वक तिथे वेगवेगळे कार्यक्रम घेऊ इच्छित आहेत, शासनाच्या पत्रिकेत त्यांचे नाव समाविष्ट असल्याचेही राम शिंदे यांनी म्हटले आहे. तसेच अहिल्यादेवी होळकर म्हणजे अनेक लोकांचे श्रद्धास्थान आहे. त्याचबरोर एखाद्या ठिकाणी पावित्र्य टिकवण्याची जबाबदारी ही सर्वांचीच असल्याचे सांगत त्यांनी राम शिंदे यांनी रोहित पवार यांना त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. तसेच मला गेल्यावेळी त्यांच्या कार्यक्रमामध्ये बोलावलं नव्हत. इतकंच नाही तर मी चौण्डी या गावचा सरपंच, आमदार, मंत्री असतानाही मला त्यांनी बोलावलं नाही. मात्र मी त्यांना बोलवलेलं असल्याचेही शिंदे म्हणाले.

Advertisements

कार्यक्रमातही व्यत्यय, अडथळा आणि लोकांचं लक्ष विचलित करणे फक्त स्टंटबाजी करण्यासाठी राजकीय मुद्दा उखरून काढला जात आहे,असा टोला त्यांनी रोहित पवार यांना लगावला आहे. तर तिथे सर्वांचे स्वागत आहे.मात्र कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल असं कुणीही कृत्य करू नये,असंही राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

Advertisements

वादावर बोलताना त्यांनी सांगितले की, वरिष्ठांनी सांगितल्यानंतर कुठेतरी थांबलं पाहिजे अशी प्रतिक्रियाही आमदार राम शिंदे यांनी दिली आहे. विखे-पिता पुत्रांवर केलेल्या आरोपानंतर राम शिंदे यांनी ही भूमिका घेतली आहे.

मी वस्तुनिष्ठ आणि वस्तुस्थितीजण्य जे काय झालं ते पक्षाकडे दिल असताना पक्षाने ते ऐकूनही घेतल आहे.त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्युत्तरही काही आलेले नाही. मी जो दावा केला आहे तो खराच असल्याच राम शिंदे यांनी म्हटलंय. त्यामुळे वरिष्ठांनी एखादी गोष्टसांगितल्यानंतर कुठेतरी थांबले पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलाय.

तसेच एकदा थांबलो दोनदा थांबलो आणि तीनदा ही थांबण्याची माझी भूमिका आहे मात्र ज्यांनी कुणी काय केलं त्यांनी पण थांबण्याची गरज असल्याचा सल्ला त्यांनी विखे यांच नाव न घेता दिलाय.

तर आधीच्या ज्या तक्रारी केल्या आहेत त्याचा निर्णय प्रलंबित आहेत आणि एकाच पक्षात असल्याच्या नंतर वारंवार असे प्रसंग कोणावरही येऊ नये असं शिंदे यांनी म्हटलंय.

भाजपामध्ये एक शिस्त आहे त्या शिस्तीचे पालन केलं पाहिजे तर असे प्रसंग कोणाच्याही समोर येणार नाहीत असेही शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

PM मोदींचा नागपुरात मुक्काम, तळेगावात सभा : नागपूर, रामटेकमध्ये आज मतदान

१९ एप्रिलला राज्यांतील पाच लोकसभा मतदारसंघात मतदान आहे. यात नागपूरचा समावेश आहे. आणि त्याच दिवशी …

महाराष्ट्र में मायावती को बड़ा झटका, एकनाथ शिंदे गुट की शिवसेना में शामिल हुए BSP के दो बड़े नेता

महाराष्ट्र में मायावती को बड़ा झटका, एकनाथ शिंदे गुट की शिवसेना में शामिल हुए BSP …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *