Breaking News

एसटी बसला अपघात; ४३ जण जखमी : राज्यात कुठे घडला भीषण अपघात? वाचा

Advertisements

धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातील परंडा – बार्शी राज्यमार्गावर आज (शनिवार) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास बस क्रमांक एम.एच. २० बी एल २१९२ पलटी होऊन भीषण अपघात घडला. परंडाहून धाराशिवकडे ही बस प्रवासी घेऊन निघाली होती. मात्र सोनगिरी येथील उल्फा नदीवरील पूला शेजारील एका धोकादायक वळणावर बस पलटी होऊन हा अपघात घडला. बसमध्ये ४३ प्रवाशी होते. यातील ७ जणांना फ्रॅक्चर, १३ जणांना डोक्याला मार लागला आहे, तर २३ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

Advertisements

सोनगिरी येथे बस पलटी होऊन घडलेल्या अपघाताची माहिती समजताच पोलीस यंत्रणा, रुग्णवाहिका मदतीसाठी तत्परतेने घटनास्थळी दाखल झाले. या अपघातातील जखमींना उपचारासाठी परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. उल्फा नदीच्या पुला शेजारील रस्त्याच्या दुतर्फा झाडे-झुडपे वाढलेली आहेत. त्‍यातच रस्त्यावर साईड पट्या नसल्याने वाहन चालविताना चालकाला अंदाज न आल्याने बस पलटी होऊन अपघात झाला आहे.

Advertisements

खोल खड्ड्यात गाडी पलटी झाल्याने समोरील व वाहकाच्या बाजूकडील अनेक प्रवाशांना मोठ्या जखमा झाल्या. सोनगिरी, खासगाव परिसरातील तरुणांनी मोठ्या शर्तीने जखमींना बाहेर काढत मदत केली. जखमींमध्ये मोठ्या प्रमाणात वृध्द कलाकर मानधन समितीच्या मुलाखतीला जाणारे कात्राबाद, कुंभेजा, सोनगिरी, देवगाव, आवारपिंपरी येथील वारकरी संप्रदायातील वृध्द महिला -पुरुष होते. या अपघातामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण झाली होती.

घटनास्थळी परंडा पोलिसांनी येऊन पंचनामा करण्यास सुरुवात केली. परंडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असणारे जखमी प्रवासी वाहन चालक सतीश पसारे, वाहक संतोष होळकर, चंद्रभागा वेताळ , दत्ता वेताळ, समिना पठाण, मंगल बोराडे, कल्याण बोराडे, आशपाक काझी, नुसरत काझी, रमेश आपर, संजय गुडे, जयसिंग नरसाळे, मुस्तफा शेख, श्रीमंत मुळीक, सहीर सय्यद, तमन्ना पठाण,रुकसाना नायर, आदित्य सोनवणे, मुकुंद करपे, बाळासाहेब कानगुडे, सोमनाथ गायकवाड, अनिता मुळीक, शिवकन्या दुधकवड, दौलत नरवड, मारुती जाधव, लता गुडे यांचा समावेश आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

वरिष्ठजनों का अनुभव और कार्यकर्ताओं का परिश्रम जीत की गारंटी है: बृजमोहन अग्रवाल के उदगार

वरिष्ठजनों का अनुभव और कार्यकर्ताओं का परिश्रम जीत की गारंटी है: बृजमोहन अग्रवाल के उदगार …

गर्मी से यातायात का बुरा हाल ट्रैफिक सिग्नल खुलने का इंतजार? जनता है परेशान

गर्मी से यातायात का बुरा हाल ट्रैफिक सिग्नल खुलने का इंतजार? जनता है परेशान   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *