Breaking News

दोन दिवसांपूर्वीच उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून गौरव आणि आता अचानक बदली : ‘आयएएस’च्या बदलीने धक्का

साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची अचानक शासनाने तडकाफडकी बदली केल्याने धक्का बसला आहे. साताऱ्यातील प्रतापगड येथील अफजल खान कबर, महाबळेश्वर येथील व कास पठारावरील अनधिकृत बांधकामे हटविणे आदी संवेदनशील कामांमध्ये खंबीर भूमिका जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली होती. त्याबद्दल राजकीय नाराजीचा सूर होता. मात्र जनतेत ते फारच लोकप्रिय झाले होते. सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी यांची सातारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नाराजीचे कारण काय?

महाबळेश्वर पाचगणी कास मॅप्रो गार्डनबाबत घेतलेली कडक भूमिका, तसेच पालकमंत्री शंभूराज देसाई यांची नाराजीचे कारण असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची दहा महिन्यांपूर्वी साताऱ्याला बदली झाली होती. दोनच दिवसांपूर्वी रुचेश जयवंशी यांचा उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच गौरव केला होता. असे असताना त्यांची तडकाफडकी बदली झाल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. दरम्यान, जयवंशी यांच्यावर राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आरोप केला होता, तर पालकमंत्री शंभूराज देसाई हे त्यांच्यावर नाराज होते, अशीही चर्चा साताऱ्यात सुरू आहे.

शेखर सिंह यांच्या जागी ते आले होते. त्यांनी जिल्ह्यात पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील जनतेच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले. सर्वसामान्य जनतेत जाणारा जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. कास महोत्सवाचे आयोजन असेल कासवरील कुंपण हटविण्याचे काम असेल, प्रतापगड येथील अफझल खानाच्या अतिक्रमण हटवण्यासाठी राबविण्यात आलेली मोहीम, तसेच नुकतीच सुरू केलेली महाबळेश्वर येथील कारवाई आदी संवेदनशील कामांमध्ये त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कठोर भूमिका घेतली होती, यामुळे रुचेश जयवंशी जिल्ह्यात जनतेमध्ये लोकप्रिय झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचेही चांगले संबंध होते. असे असताना त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

About विश्व भारत

Check Also

जिल्हा अंतर्गत बदल्या अडकल्या

शिक्षकांच्या जिल्हा बदली प्रक्रियेला २४ एप्रिल पासून सुरुवात झाल्यानंतर बदली पात्र गुरुजींनी सुटकेचा श्वास सोडला …

शेतकऱ्यांची लूट! जिल्हाधिकाऱ्यांची थेट धडक

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात कृषी निविष्ठांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवण्याबरोबरच विक्री व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचे प्रशासनापुढे आव्हान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *