Breaking News

नागपुरात कोंबड्याला काजू, बदामचं जेवण : फक्त कोंबडा नाही, पैलवान आहे…!

Advertisements

नागपुरात सध्या सुल्तान कोंबड्याची चांगलीच चर्चा आहे. अवघ्या एका वर्षाच्या असलेल्या या सुल्तान कोंबड्याचं वजन हे तब्बल सहा किलो इतकं आहे. हा कोंबडा फायटिंगसाठी ओळखला जात आहे. तो इतर कोंबड्यांना एका फटक्यात जमिनीवर लोळवतो, असा दावा केला जातो. विशेष म्हणजे त्याची किंमतीही अगदी तितकीच महाग आहे.

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात किशोर उतखेडे यांचा हा कोंबडा आहे. हा सुल्तान अवघ्या एक वर्षांचा आहे. पण त्याचं वजन तब्बल 6 किलो इतकं आहे. हा सुल्तान खरंच ताकदवान आहे, असा दावा केला जातोय. तो बांग देतो तेव्हा प्रतिस्पर्धी कोंबड्याला फायटिंगसाठी सज्ज असल्याचा सिग्नल देतो, असं सुल्तानचा मालक सांगतो.

Advertisements

जेवणात काजू, बदाम

हा सुल्तान कोंबडा त्याच्या फायटिंगसाठी जास्त प्रसिद्ध आहे. तो त्याच्या एकाच फाईटमध्ये समोरच्या कोंबड्याला जमिनीवर पाडतो, असा दावा केला जातोय. विशेष म्हणजे या सुल्तान कोंबड्याची देखभालही तशीच केली जातेय. या सुल्तानला जेवणात काजू, बदाम दिलं जातं. तसेच त्याला कोंबडीचं एक अंडही खायला दिलं जातं, असं त्याच्या मालकाने सांगितलं.

सुल्तान कोंबड्याला खाण्यासाठी कोंबडीचं रोज एक अंड लागतं. काजू, बदाम सकाळ-संध्याकाळी खाऊ घालावं लागतं. त्याला टाकीमध्ये थोडसं पोहायलाही लावं लागतं. त्यामुळे त्याचा दम, श्वास चांगला वाढतो”, असं सुल्तान कोंबड्याच्या मालकांने सांगितलं.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प

नकली MARC बेयरिंग्स के उपयोग से खापरखेडा बिजली संयंत्र का उत्पादन ठप्प नागपुर। महाराष्ट्र राज्य …

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन

अनुबंध श्रमिकों को न्याय दिलाने पर श्रमायुक्त का आभार अभिनंदन   टेकचंद्र शास्त्री: 9822550220   …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *