Breaking News

नागपुरात डॉक्टरकडून बाळाची विक्री

Advertisements

नागपुरातील अजनी पोलीस ठाण्यात एक बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात महिलेने बाळाला जन्म दिला. संबंधित डॉक्टरने कुणाला न सांगता या बाळाची विक्री केली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉक्टरला अटक केली आहे.

Advertisements

डॉ. आशिक बराडे (४२) रा. कोलते लेआऊट, मानकापूर असे डॉक्टरचे नाव असून त्याचे गोधनीत रुग्णालय आहे.

Advertisements

प्रकरण काय?

माहितीनुसार, अजनीत २८ मार्च २०२३ रोजी एका महिलेच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. या संबंधातून महिलेने डॉ. बराडेंच्या रुग्णालयात बाळाला जन्म दिला.परंतु, बलात्काराचा आरोपी व डॉक्टर महिलेला बाळाची माहिती देत नव्हते. त्यामुळे महिलेने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांच्या तपासात डॉक्टरने खोटे कागदपत्र तयार करून हे बाळ इतरांचे असल्याचे भासवून त्याची विक्री केल्याचे पुढे आले. त्यामुळे पोलिसांनी डॉक्टरला अटक केली. या डॉक्टरने या आधीही असे कृत्य केले का, हे पोलीस तपासत आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुर के सिविल लाइंस और शंकर नगर में 25 मई से शुरू होगा स्मार्ट मीटर लगाने की शुरुआत

नागपुर के सिविल लाइंस और शंकर नगर में 25 मई से शुरू होगा स्मार्ट मीटर …

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *