Breaking News

सिंचन घोटाळ्याची पंतप्रधान मोदीना अपूर्ण माहिती : महाराष्ट्रातील मंत्र्याची प्रतिक्रिया

Advertisements

सिंचन घोटाळ्याचे आरोप पूर्वी केले जात होते. सर्व चौकशा पूर्ण होऊन अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. पंतप्रधानांना कदाचित पूर्ण माहिती दिली गेली नसेल. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला. आगामी काळात त्यांना योग्य माहिती देऊ, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त मंत्री अनिल पाटील यांनी दिली आहे.

Advertisements

जिल्हा दूध उत्पादक संघाच्या बैठकीला मंत्री पाटील आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंतप्रधानांनी राष्ट्रवादीवर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यानंतर राष्ट्रवादी शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्याबाबत पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता. शिखर बँकेबाबतच्या नोटीसबाबत मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय पक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना सांगितला नव्हता. त्यांच्या निर्णयावर त्यांनी माघार घेतली. देशाची जबाबदारी स्वत:च घेण्याचा निर्णय घेतला. नवीन फळीला संधी द्यायला हवी होती. त्यांचा निर्णय उचित नव्हता.

Advertisements

शरद पवार घरात बसणारे नेते नाहीत : मंत्री पाटील म्हणाले, शरद पवार हे घरात बसणारे नेते नाहीत. पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे गैर नाही. आगामी काळात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारही महाराष्ट्र दौरा करणार आहेत. त्याचा अर्थ राष्ट्रवादीत चढाओढ आहे, असा नसल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले.

रस्त्यावर विद्यार्थी उभे करण्याची कृती चुकीचीच

आश्रमशाळेच्या किंवा शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्त्यावर उभे केल्याच्या कृतीचा मी स्वत: विरोधात आहे. अशा कोणत्याही सूचना मी दिलेल्या नव्हत्या. माझ्यासोबत कार्यकर्त्यांचा ताफा होता. मला प्रसार माध्यमातून विद्यार्थी रस्त्यावर उभे केल्याचे कळाले. ही कृती चुकीची असून याचे समर्थन करणार नाही, असे मंत्री पाटील म्हणाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

शासकीय रुग्णवाहिकेला ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

शासकीय रुग्णवाहिकेला(ऍम्ब्युलन्स)ड्रायव्हर नसल्याने बालकाचा मृत्यू : महाराष्ट्र सरकार झोपेत

औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव येथे शासकीय रुग्णवाहिकेस डिझेल मिळाल्याने एका नवजात बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *