Breaking News

क्रिकेटच्या मैदानात हार्ट अटॅक : 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Advertisements

व्यायाम करताना, चालता चालता, खेळताना तरुण जागीच कोसळून मृत्यू झाल्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. आता गुजरातमध्ये अवघ्या २० वर्षांच्या तरुणाचा क्रिकेटच्या मैदानातच मृत्यू झाल्याची घटना घडली.

Advertisements

गुजरातच्या अरावली इथं तरुणाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अरावलीच्या मोडासा इथं गोवर्धन सोसायटीतील तीर्थ अपार्टमेंटमध्ये पर्व सोनी हा राहत होता. क्रिकेटच्या मैदानात खेळत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने तो खाली कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. पर्व सोनी हा इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता. त्याच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तेलंगनाच्या नांदेडमध्ये एका तरुणाचा नाचताना मृत्यू झाला होता. त्याचं वय फक्त १९ वर्षे इतकं होतं. तर तेलंगनातच हैदराबादमध्ये जिममध्ये वर्कआउट करताना एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता.

Advertisements

हैदराबादमध्ये याआधी एका लग्नात नवरदेवाला हळद लावताना एक व्यक्ती अचानक खाली पडला आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला होता. तर एक जण चालता चालता रस्त्यावरच कोसळला होता. त्यावेळी सुदैवाने ट्राफिक पोलिसांनी सीपीआर देऊन त्याचा जीव वाचवला होता.

गुजरातच्या अहमदाबादमध्ये एका क्रिकेट सामन्यावेळी जीएसटी कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता. जीएसटी कर्मचारी आणि जिल्हा पंचायतीच्या कर्मचाऱ्यांमध्ये हा सामना होता. गोलंदाजी करताना जीएसटी कर्मचाऱ्याची तब्येत बिघडली आणि तो जमिनीवर पडला.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *