Breaking News

काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची अजित पवारांसोबत ‘गुप्त’भेट

Advertisements

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत. अजित पवारांच्या दालनात अशोक चव्हाण उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. या भेटीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर ‘गुफ्तगू’ झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता आहे.

Advertisements

मुंबईत आज महाविकास आघाडीच्या आमदारांची संयुक्त बैठक पार पडणार आहे. या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख नेते मार्गदर्शन करणार आहेत. उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, समाजवादी पार्टीचे अबू आझमी, शेकापचे नेते जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते अजय चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड तसेच विधानपरिषदेचे सदस्य शिवसेना आमदार अनिल परब, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे उपस्थित असणार आहेत. या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित राहणार का? असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार

विधानसभा चुनाव फर्जी मतदान का पर्दाफास : 25 विदेशी गिरफ्तार टेकचंद्र शास्त्री: 9822550220   चेन्नई। …

सुनेत्रा पवार यांचं उपमुख्यमंत्री पद धोक्यात!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. निवडणूक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *