Breaking News

पोवाडे गायनातून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

Advertisements

कन्हाण : साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंती निमित्त कन्हlण येथे भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया द्वारे आयोजित कार्यक्रमात शाहिर राजेंद्र बावनकुले,कवी ज्ञानेश्वर वांढरे आणि शाहीर कलाकार यांनी साहित्यसम्राट लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या छायाचित्रा ला माल्यार्पण करून अभिवादन केले,
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर कार्यक्रमाचे उद्घाटक शाहीर राजेंद्र बावनकुळे,मानधन समिती सदस्य यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी पोवाडे व डफाच्या साहाय्याने मानवतावादी मूल्यांची व अधिकाराची जनमानसामध्ये पेरणी केली.शोषित कामगारांच्या अन्यायाला आपल्या साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडून न्याय मिळवून दिले असे शाहीर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केले,तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष कवी ज्ञानेश्वर वांढरे यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. शाहीर अरुण मेश्राम,भैय्यालाल माकडे, यांनी मार्गदर्शन केले. कन्हान येथे आयोजित कार्यक्रमात शाहिर राजेंद्र बावनकुले यांचा कार्यक्रमाचे आयोजक शाहीर भगवान लांजेवार आणि मंडळ यांच्या हस्ते शाल श्री फल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला,यावेळी प्रास्तविक शाहीर भगवान लांजेवार यांनी तर संचालन नितीन लांजेवार यानी केले आभार प्रदर्शन नत्थुजी चरडे यांनी मानले, यावेळी शाहीर चीरकुट पुंडेकर ,भगवान लांजेवार,अरुण मेश्राम,रवींद्र मेश्राम, भैय्यालाल माकडे, वीरेंद्र शेंगर, कवडू रोकडे,विजय चकोले यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर पोवाडे गीत गायन केले. रामटेक तालुका अध्यक्ष शा रवींद्र मेश्राम, मौदl तालुका अध्यक्ष शाहिर उपसरपंच वीरेंद्र शेंगर ,श्रावण लांजेवार,हिरालाल लूहुरे,पुरुषोत्तम कुंभलकर,रमेश गणोरकर, हरीनाथ लेंडे,गोतमारे,गजानन कच्छवा,नामदेव डाफ,गजानन पुंडेकर,भास्कर बादुळे,गजानन सातनुरकर, श्रीभवन केरवर,अशोक हेटे,अनिल बोबडे, विमल वडे,प्रभा काळे,विमल खडसे, वर्षा भोयर,विमल भोयर,शेवंता चरडे,कल्पना हिंगे, गुणा उमाठे,गवरा सोनवणे,बेबी गायकवाड, आशा भस्मे,कुसुम मदनकार,सुरेखा भुते,आणि शाहीर कलाकार प्रामुख्याने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

About विश्व भारत

Check Also

नागपुरातील भाजप आमदार कृष्णा खोपडेंची फसवणूक

भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांची एका ठकबाजाने आर्थिक फसवणूक केली. आरोपीने दिलेल्या खोट्या माहितीवर विश्वास …

नागपूर जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू

नागपूर जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *