Breaking News

नागपुरात सेट टॉप बॉक्समधील विजेच्या धक्क्याने 4 वर्षीय बालकाचा मृत्यू : तर भंडाऱ्यात खेळताना बालकाचा मृत्यू

Advertisements

टीव्हीचा सेट टॉप बॉक्स ओढणाऱ्या एका 4 वर्षीय बालकाचा नागपुरात विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरच्या हिंगणा तालुक्यात ही घटना घडली आहे. प्रियांशू ज्ञानेश्वर चव्हाण असे मृत बालकाचे नाव आहे.

Advertisements

प्रियांशू घरात खेळत होता. त्याने घरातील टीव्हीच्या सेट टॉप बॉक्सला हात लावला. त्यानंतर तो बॉक्स ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. यामुळे त्याची शुद्ध हरपली. वडिलांनी तातडीने त्याला हिंगणा ग्रामीण रुग्णालयात नेले. पण तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

Advertisements

भंडाऱ्यात खेळताना बालकाचा मृत्यू

घराच्या स्लॅबवर खेळणाऱ्या एका 9 वर्षीय मुलाचा खाली पडून मृत्यू झाल्याची वेदनादायी घटना भंडाऱ्यात 9 दिवसापूर्वी घडली आहे. उमंग प्रशांत साखरवाडे असे मृत बालकाचे नाव आहे. भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील मोहगाव देवी गावात 31 जुलै रोजी ही घटना घडली.

यासंबंधीच्या वृत्तानुसार, उमंगने घरी कुणी नसल्याचे पाहून स्वतःच्या घरावरून दुसऱ्या घरावर उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. हा खेळ तो आपल्या भावासोबत खेळत होता. यात त्याचा उंचावरून खाली पडला आणि बेशुद्ध झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मोठा भाऊ उमंग स्लॅबवरून खाली पडल्याची माहिती त्याच्या लहान भावाने धावत जात शेतात काम करणाऱ्या आपल्या वडिलांना दिली. त्यानंतर त्यांनी त्याला तातडीने डॉक्टरांकडे नेले. पण तोपर्यंत उशीर झाला होता. उमंगचा मृत्यू झाला होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद : शहरातील कोणता भाग प्रभावित होणार? वाचा

आज नागपुरात वीज खंडित, पाणीपुरवठाही राहणार बंद   कोणकोणत्या भागात पाणीपुरवठा खंडित   नागपूरकरांसाठी एक …

BHEL को मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश

BHELको मिला है कोराडी की तापीय विधुत परीयोजना निर्माण का कार्यादेश   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *