Breaking News

मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायसारखे डोळे होतात आणि मुलीही पटतात : कोणी केले विधान?

Advertisements

मासे खाल्ल्याने डोळ्यात सुंदरता येत असून मुलीही पटतात, असे तर्कट राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मांडले आहे.

Advertisements

यावरच ते थांबले नाहीत तर त्यांनी याचा दाखला देताना अभिनेत्री ऐश्वर्या रायचा उल्लेख केला. नियमित मासे खाल्ल्यामुळेच ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर आहेत, असे ते म्हणाले. गावित एका जाहीर कार्यक्रमात बोलत होते. त्यांचे हे विधान चांगलेच चर्चेत आले आहे.

Advertisements

धुळे जिल्ह्यातील अंतूर्ली येथे आदिवासी मच्छिमार बांधवांना मासेमारीचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी विजयकुमार गावित बोलत होते. यावेळी त्यांच्या कन्या डॉ. सुप्रिया गावितही उपस्थित होत्या. दरम्यान, गावित यांनी केलेल्या या विधानामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे.

तुम्ही ऐश्वर्या रायला चित्रपटामधून बघितली असेल. ऐश्वर्या रॉय बेंगलोरच्या समुद्र किनारी राहत होती. त्यामुळे ती दररोज मासे खायची. त्यामुळे तिचे डोळे सुंदर आहेत. मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ल्याने बाईमाणूस चिकनी दिसते. डोळेपण तरतरीत दिसतात. कुणीही बघितले तरी पटवूनच घेणार. आपली त्वचाही चांगली दिसते. माशांमध्ये एक प्रकारचे तेल असते. त्यामुळे डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी त्याचा चांगला फायदा होता, असेही गावित म्हणाले.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *