Breaking News

गोंदियात 3 बिबट्यांची शिकार

Advertisements

वीज प्रवाह सोडून तीन बिबट्यांची शिकार करण्यात आल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी-आमगाव मार्गावरील बिसेन यांच्या राईस मिलला लागून असलेल्या जंगलात घडली. सोमवारी रात्री गावकऱ्यांना हे बिबट मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान या प्रकाराची गावकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली.

Advertisements

वडेगाव येथील काही गावकऱ्यांनी या घटनेची माहिती रात्री ९:३० वाजताच्या सुमारास वनखात्याला दिली. माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. विद्युत प्रवाहाला स्पर्श झाल्याने तिन्ही बिबट्यांचा मृत्यू झाला असून हा प्रकार शिकारीच्या दृष्टीने केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. यासंदर्भात वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनीसुद्धा या घटनेला दुजोरा दिला आहे.

Advertisements

मागील काही महिन्यांपासून देवरी व सालेकसा परिसरातील जंगलात शिकाऱ्यांची टोळी सक्रिय असल्याची चर्चा आहे. या प्रकरणात चारजणांना अटक करण्यात आली आहे.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

अरवली पर्वत वाचविण्याची धडपड!

✍️लेखक : *रमेश लांजेवार* (मुक्त पत्रकार ) 📱9921690779 अरवली पर्वतांचे खनन खूप जुन्या काळापासून सुरू …

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…!

हेलीकॉप्टर में सवार होकर बाघिन गई ससुराल…! टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   सिवनी। पेंच टाइगर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *