शनिवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आली होती.
अमृत महोत्सवी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या या बैठकीत मराठवाडा तसेच राज्याच्या विकासाचे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. पण, मराठवाड्याच्या रस्त्यासाठी एकही पैसा देण्यात आलेला नाही. यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे.
१. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर जलसिंचन होणार. ११ जलसंपदा प्रकल्पांना मान्यता. १३ हजार ६७७ कोटींचा सुधारित वाढीव खर्च मंजूर..
२) अंबाजोगाई तालुक्यात लाल कंधारी, देवणी देशी गोवंशाचे जतन करणार.
३) छत्रपती संभाजीनगरला फिरत्या भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळेची स्थापना करण्यात येणार..
४) ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद. यातून मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ होणार.
५) हिंगोली येथे नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालयासाठी ४८५ कोटी खर्चास मान्यता.
६) राज्यातील वरिष्ठ निवासी डॉक्टर्सना ८५ हजार रुपये दरमहा मानधन १२.८५ कोटी खर्चाची तरतूद.
७) सौर ऊर्जा कुंपणासाठी रक्कम थेट हस्तांतरित होणार
८) समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ.
९) राज्यातील शाळा आता दत्तक घेता येणार गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी निर्णय.
१०) सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय
११) परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
१२) परळी वैजनाथ येथे नवीन शासकीय कृषी व्यवसाय व व्यवस्थापन महाविद्यालय
१३) परळी वैजनाथ येथे सोयाबीन संशोधन प्रशिक्षण व प्रक्रिया उपकेंद्र. सोयाबीन उत्पादनास गती येणार
१४) सोयगाव तालुक्यात शासन अनुदानित कृषी महाविद्यालय
१५) नांदेड येथे नवीन शासकीय कृषी महाविद्यालय
१६) धाराशिव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा
१७) जालना येथे आयटीआय इन्क्युबेशन सेंटर स्थापन करण्यात येणार, १० कोटींची मान्यता.
१८) गोर (बंजारा) समाज भवनासाठी नवी मुंबई येथे भूखंड देणार
१९) राज्यात ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण’ अभियान राबविणार
२०) २००५ पूर्वी नियमित पदावर अस्थायी सेवेतील कार्यरत आणि २००९ मध्ये नियमित सेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना मॅटच्या आदेशाचा लाभ..
अशा महत्त्वपूर्ण निर्णयांसह संपन्न झालेल्या या बैठकीस राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार व मंत्रिमंडळाची उपस्थिती होती.