Breaking News

कारचा पाठलाग करून गोळ्या झाडल्या : नागपूरपासून 100 किमी अंतरावर गँगवॉर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाची जुन्या वादातून गोळ्या झाडून करण्यात आली आहे. नईम खान असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. या घटनेने परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे.

प्राप्त माहितीनुसार, तुमसरात गँगवॉरमुळे एकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. मृतक नईम खान हा मोक्काचा आरोपी असून जुन्या वादातून त्याची हत्या झाल्याचा पोलिसांना अंदाज आहे. तुमसर तालुक्यात ही गोळीबाराची घटना घडली आहे. नईम चारचाकीत असतानाच त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यातच त्याचा मृत्यू झाला.

नेमकं काय घडलं?

तुमसर तालुक्यातील गोबरवाही रेल्वे क्रॉसिंग जवळ रेल्वे फाटक लागलं असताना खान चारचाकी गाडीमध्ये बसलेला होता. याच संधीचा फायदा घेत आरोपीने त्याच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या. या गोळीबारात नईम खान आणि त्याचा एक साथीदार हे दोघेही जखमी झाले.

त्या दोघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. नईमला रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर दुसऱ्या जखमीवर सध्या उपचार सुरू आहेत.

नईमसोबत असलेल्या जखमीची सध्या माहिती मिळाली नाही. या हत्याकांडामागे कोण आरोपी आहेत, याचा सध्या पोलीस तपास घेत आहे. तुमसर तालुका हा सतत गँगवारसाठी प्रसिद्ध आहे. या अगोदरही इथे बरेचदा बंदुकीतून गोळ्या झाडून किंवा धारदार शस्त्राने हत्या झालेल्या आहेत. यात पुन्हा एका हत्याकांडाची भर झालेली आहे.

About विश्व भारत

Check Also

संतान प्राप्ति मे रुकावट बन सकता वास्तुदोष और अवैध यौन संबंध 

संतान प्राप्ति मे रुकावट बन सकती है वास्तुदोष और अवैध यौन संबंध   टेकचंद्र शास्त्री: …

MP कें देवास में दर्शन करने आए UP के श्रद्धालुओं से मामूली बातचीत पर मारपीट

MP कें देवास में दर्शन करने आए UP के श्रद्धालुओं से मामूली बातचीत पर मारपीट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *