Breaking News

‘देवेंद्र काकांना भेटायचंय’, फडणवीस म्हणतात, ‘माझं मन भरून आलं…’

Advertisements

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडमध्ये दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाचं उदघाटन झाले. त्यावेळी त्यांनी मंडणगडच्या भाजप कार्यालयाला सदिच्छा भेट दिली.

Advertisements

भाजप कार्यालयात पोहोचल्यावर एका चिमुकल्याने फडणवीसांचं गुलाबाचं फुल देऊन स्वागत केलं. त्याचा किस्सा एका भाजप कार्यकर्त्याने एक्स पोस्ट करत शेअर केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी भावूक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.

Advertisements

गेले दोन दिवस मी, देवेंद्र फडणवीस मंडणगड येथे येणार असल्याकारणाने त्यांच्या कार्यक्रमाच्या नियोजनात होतो. त्यामुळं साहजिकच रात्री घरी यायला उशीर व्हायचा. माझा मुलगा वेदांतने विचारलं, बाबा तुला इतका उशीर का होतोय? तर त्याला मी देवेंद्र फडणवीस मंडणगड येथे येणार आहेत असं सांगितले. मग त्यानेही माझ्याजवळ हट्ट केला की, मलाही फडणवीस काकांना भेटायचंय आणि त्यांना फुल द्यायचंय.

रात्री झोपेतही तो ‘फडणवीस काकांना भेटायचंय, फडणवीस काकांना भेटायचंय’ असं बरळत होता. सकाळी अगदी आठवणीने त्याच्याकडे पुष्पगुच्छ देऊन ठेवला होता. देवेंद्रंना नियोजित वेळेपेक्षा कार्यक्रम स्थळी यायला थोडा उशीर झाला. कार्यकर्त्यांचीही प्रचंड गर्दी उसळली होती. त्यात प्रचंड ऊनही होते. परंतु कोणत्याही स्थितीत फडणवीस काकांना भेटणार आणि त्यांना फुल देणार या हट्टापायी कसलीही तमा न करता फक्त आईकडे ‘फडणवीस काका केव्हा येणार, फडणवीस काका केव्हा येणार’ असा जागर सुरू होता.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

मोदी का बयान : महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!

महाराष्ट्र के नगर निगमो मे महायुति की विजय!PMमोदी ने कहा थैंक्यू   टेकचंद्र सनोडिया शास्त्री: …

मुंबईत उद्धव ठाकरे आघाडीवर, तर नागपूर, पुण्यात कोण बाजी मारणार?

मुंबई,नागपूर, संभाजीनगर, पुण्यासह महाराष्ट्रातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी गुरुवारी (ता. 15 जानेवारी) मतदान पार पडले. त्यानंतर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *