Breaking News

नागपूरमध्ये लुटली प्रवाशांची बस : खळबळ

Advertisements

नागपूरमध्ये सात जणांच्या टोळीने प्रवाशांची बस लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून ही लुटमार करण्यात आल्याची माहिती आहे. या घटनेत एकूण पावणे दोन लाखांचा ऐवज लुटल्याची प्राथमिक माहिती आहे. रामटेक पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील आमडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग ४४ येथे आज बस लुटल्याची घटना घडली. सात जणांच्या टोळीने मिळून ८० प्रवाशांची बस लुटली. चोरट्यांनी प्रवाशांकडून एकूण १ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज लुटून पळ काढला. फिर्यादीच्या तक्रारीवरून रामटेक पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणातील संशयित तीन आरोपींना अटक करण्यात आले आहे.

Advertisements

आरोपी कोण?

दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अमन ईश्वर इंगळे (२६ वर्षे, रा. रामबाग नागपूर), गुलाब शाबीर शेख (३२ वर्षे, रा. कपिलनगर नागपूर), रशीक शेख रफिक शेख (३४ वर्षे, रा. दिघोरी नागपूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

Advertisements

About विश्व भारत

Check Also

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज 

SDM निलंबित, इस आदेश को लेकर गिरी गाज टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   देवास। मध्य …

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया

झगडालू पत्नी के खिलाफ कानूनी शिकायत का अधिकार, प्रक्रिया टेकचंद्र सनोडिया शास्त्री: 9822550220   नई …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *